Monday 16 May 2011

डोके तर तेव्हा सर्वांनाच होते

डोके तर तेव्हा सर्वांनाच होते, पण राज्यघटना लिहिण्या एवढी बुद्धी मात्र फक्त भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनाच होती. कारण आपल्या भारत देशाचे पुढील लाखो वर्षांचे भवितव्य ठरवणारी आणि भारत देशाला बलशाली बनविणारी राज्यघटना लिहिण्याचे काम सर्वांनी एक मुखाने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपविले आणि आश्चर्य म्हणजे तेव्हा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात सगळे असताना राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी मात्र सर्वांनी एका क्षणात मान्य केली होती , हा निर्णय घेऊन त्याकाळी सर्व भारत देशाने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आणि त्यांच्या विद्वत्तेला दिलेली मानवंदना होती. आणि आपण आता बघतच आहोत कि हजारो वर्ष गुलामगिरीत काढलेल्या या आपल्या भारत देशाला या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने जगातील १२ व्या नंबरची अर्थव्यवस्था बनविली आहे आणि आपण याच राज्यघटनेचा आधार घेऊन चाललो तर लवकरच आपण एक नंबर ची महाअर्थव्यवस्था होऊ.
                  म्हणून माझा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना सदैव प्रणाम
                                                                        जयभीम ,जय भारत

No comments: