Monday 16 May 2011

बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म का बदलला ?

बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला नसता तर आज नव बौद्ध् हा प्रकार अस्तित्त्वात आला नसता. मात्र बाबासाहेबांनी हा निर्णय इम्पल्सिव्हली घेतलेला नाही. सुमारे वीस वर्षाचा काळ त्यांनी हिंदू धर्म पीठाला त्यांच्या निर्णयावर विचार करण्यासाठी दिला होता. बाबासाहेबांच्या मागण्या साध्या सोप्या व मानवतावादी होत्या. दलितांना 'समान' हक्क देणे. आणि समान हक्क म्हणजे काय तर एकाच पाणवठ्यावर पाणी भरण्यास परवानगी, मंदिरांमध्ये प्रवेश, जातीवर आधारित भेदभाव न करणे, विटाळ न मानणे इ. मात्र इतकी वर्षे आपले धर्म पीठ झोपलेले राहिले. धर्मबदल करतानाही बाबासाहेबांनी व्यापक देशहित विचारात घेतले होते. ज्यांची जीवनपद्धती इथल्या हिंदू जीवनपद्धतीशी साधर्म्य असणारी आहे असा भारतीय संस्कृतीमध्ये जन्मास आलेला बौद्ध धर्म स्वीकारला.
भारतात दिलेले आरक्षण हे हिंदू धर्मव्यवस्थेने दिलेले नसून भारतीय राज्यघटनेने दिलेले आहे. त्यामुळे फक्त हिंदूंना आरक्षण मिळावे हे म्हणणे चुकीचे आहे. मुसलमानांमध्येही जातीव्यवस्था आहे. मुस्लिम ओबीसी असा गट आहे. शिवाय इथले मुसलमान आणि ख्रिश्चन हे हिंदूधर्माने नाकारलेल्या समानतेमुळेच त्या धर्मामध्ये गेलेले आहेत.

1 comment:

Unknown said...

बाबासाहेबांची व्यापक दृष्टी हि सर्व लोकांकडे असती तर भारतात जात , धर्म ,पंथ यांच्या आधारावर मते मागत स्वतःची तुंबडी भरणारे लोक राहिले नसते ...बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी स्वतः त्यांचा अभ्यास केला पाहिजे ...आणि स्वतः ला समजल्या नंतर ते विचार इतर सर्व लोकांना मग ते कोणत्याही जाती धर्माचे असतील त्यांना प्रभावी पणे समजवायची गरज आहे.....