Tuesday 24 May 2011

राष्ट्रीय दिनदर्शिका शके सवंत व बौद्ध संस्कृती

 
          मागच्या 2500 वर्षात बौद्ध संस्कृतीने भारताला व जगाला अनेक गोष्टींची देणगी दिलेली आहे. योग-शास्त्र, आयुर्वेद, आधुनिक शिक्षण-पद्धती, मार्शल आर्ट, स्थापत्य शास्त्र व मानसशास्त्र इत्यादी ज्ञानशाखा बौद्ध संस्कृतीतून निर्माण झालेल्या आहेत. तर राष्ट्रीय ध्वजावरील धम्मचक व चारही दिशेला धम्म गर्जना करणारे सिंह ही राज-मुद्रा बौद्ध  संस्कृतीची देणगी आहे. पण, भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका शके सवंत ही सुद्धा बौद्ध संस्कृतीची देणगी आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे ह्या दिनदर्शिकेशी आपला काही संबंध नाही, अशी भूमिका अनेक बौद्ध लोक मांडतात.
तसेच, बौद्धांची चळवळ भरकटविण्यासाठी किंवा नष्ट करण्याकरिता अनेक संघटना कार्यरत आहे. यांची कार्यपद्धती म्हणजे इतिहासाचे विदुपीकरण किंवा सामावून घेणे असे आहे. जसे प्राचीन बौद्ध लेण्यांचा बाजूला मूर्तीची स्थापना करणे व कालांतराने त्यावर कब्जा करणे. बुद्धगयेस महाबोधी विहारावर अजूनही असलेला गैर-बौद्धांचा ताबा, महाशिवरात्रीच्या दिवशी मुंबई परिसरात असलेल्या लेण्यास पूजा-पाठ करण्यास येणारा जन-समूह व 26 जानेवारीशी काहीही संबंध नसताना सरकारी कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी होणाऱया सत्यनारायणाची पूजा, हे याचे जिवंत उदाहरण आहेत.
शके सवंतची ऐतिहासिक पार्श्वभूमी : शके संवतची उदाहरण शक वंशातला सम्राट कनिष्क (78-101)ने राज्याभिषेकपासून केली. आणि आजही शके संवत व ग्रेगरियन दिनदर्शिकेत 78 वर्षाचे अंतर कायम आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार काश्मिर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशियापर्यंत होता. बघा : चित्र क्र.1 त्याच्या काळात चौथी धम्मसंगिती जालंधर किंवा काश्मिरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मुर्तीसुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वतची व भ. बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. (बघा : चित्र क्र. 2). सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा 400 फुट उंच होता. सम्राट कनिष्कामुळे बुद्धाच्या धम्मप्रसार मध्य आशिया व चीन या भागात झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जुनसारखे विद्धान व चरकसारखे वैद्य त्यांचे दरबारी होते. (संदर्भ :1. बौद्ध धर्म के 2500 वर्ष : राहुल सांकृत्यायन, 2. जगातील बुद्धधम्माचा इतिहास : मा.श. मोरे, पृ. 22-24; 3. Ancient and Medieval India : Prasad, Pg. 114-123)
दिनदर्शिकेचे प्रकार : तीन प्रकारच्या दिनदर्शिकेचे अस्तित्व आहे. पहिली ः सूर्यावर आधारलेली ग्रेगरीअन जी कार्यालयात वापरली जाते. या दिनदर्शिकेचा संबंध ख्रिस्ती संस्कृतीसोबत येतो. दुसरी : चंद्रावर आधारलेला म्हणजे हिजरी सवंत. या दिनदर्शिकेचा संबंध मुस्लिम संस्कृतीसोबत येतो. तर तिसरी दिनदर्शिका सूर्य व चंद्र यांच्यावर आधारलेली आहे. यात विकम सवंतचा ब्राह्मणी (हिंदू) तर शके सवंतचा संबंध बौद्ध संस्कृतीशी येतो. विक्रम सवंतला नेमके कुणी सुरू केले, याचा ऐतिहासिक दाखला मिळत नाही. शके सवंतला किंचित बदलून राष्ट्रीय दिनदर्शिकेचा दर्जा 1956ला देण्यात आला. तरीसुद्धा सार्वजनिक सुट्टीकरिता जुनाच शके सवंत वापरला जातो.
दिनदर्शिकेचा व बौद्ध संस्कृतीचा संबंध : बौद्ध संस्कृतीतील सर्व कार्यक्रम पौर्णिमा, अमावस्या व अष्टमीप्रमाणे ठरलेले आहेत. बुद्ध पौर्णिमा, गुरू पौर्णिमा (पंच वर्गिय भिक्षुस धम्मदेसना), माघ पौर्णिमा, वर्षावास व धम्मचक्र प्रवर्तन दिवस या सर्वांच संबंध चंद्रावर आधारलेल्या दिनदर्शिकेशी येतो. बौद्ध परंपरेप्रमाणे काही ठळक घटना आणि त्यांचा दिनदर्शिकेशी संबंध पुढे दिला आहे. (संदर्भ : तथागतांच्या धम्मात पौर्णिमांचे महत्त्व : रा.पि. गायकवाड)
चैत्र पौर्णिमा (चित्त) : सुजाताचे भ. बुद्धास खिरदान, वैशाख पौर्णिमा (वेसाक्को) : भ. बुद्धांचा जन्म, 35व्या वर्षी ज्ञानप्राप्ती व 80व्या वर्षी महापरिनिब्बान, ज्येष्ठ पौर्णिमा (जेठ्ठ) : तपुस्स व भल्लुकाची धम्मदीक्षा, संघमित्रा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधीवृक्ष लावला, आषाढ पौर्णिमा (आसाळहो) : राणी महामायाची गर्भधारणा, राजपूत्र सिद्धार्थाचे महाभिनिष्कमण, सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच गुरू पौर्णिमा, वर्षावासाची सुरूवात, श्रावण पौर्णिमा (सावणो) : अंगुलीमालाची दीक्षा, भ. बुद्धांच्या महापरिनिब्बान नंतर पहिली धम्म संगितीची सुरूवात, भाद्रपद (पोठ्ठपादो) : वर्षावासचा कालावधी, अश्विन (अस्सयुजो) : पौर्णिमेस वर्षावास समाप्ती, या महिन्याच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकची भिक्खू मोग्लीपुत्त तिस्स यांच्याकडून धम्मदीक्षा अर्थात अशोक विजयादशमी, बाबासाहेब आंबेडकर व 5 लाख लोकांची नागपुरला धम्मदीक्षा, कार्तिक पौर्णिमा (कार्तिको) : आधुनिक मूलगंधकुटी विहार, सारनाथला अनागरिक धम्मपाल यांनी तक्षशिला (पाकिस्तान) येथे प्रात्प झालेल्या भगवंताच्या पवित्र अस्थी भारतात आणून सुरक्षित ठेवल्या. या अस्थींच्या दर्शनार्थ जगभरातील उपासक पौर्णिमेस भेट देतात, मार्गशिर्ष (मागसीरो) : पौर्णिमेस सिद्धार्थ गौतम यांची बुद्धत्व करण्यापूर्वीची राजा बिंबीसार सोबत पहिली भेट, पौष पौर्णिमा (पुस्सो) : राजा बिंबीसारांची धम्मदीक्षा, माघ (माघो) पौर्णिमा : भ. बुद्धांची महापरिनिब्बनाची घोषणा, स्थविर आनंद यांचे परिनिब्बान, फाल्गुन (फग्गुनो) पौर्णिमा : बुद्धत्व प्राप्ती नंतर कपिलवस्तूस पहिली भेट, पुत्र राहुलची धम्मदीक्षा.
स्पष्टपणे, बौद्ध संस्कृतीची नाळ चंद्रावर आधारित दिनदर्शिकेशी जुळलेली आहे. याच दिनदर्शिकेच रूपांतरण नंतर सम्राट कनिष्काने शके सवंत यात केला. तरीही बौद्ध दिनदर्शिका नाही, याचा बौद्ध संस्कृतीशी काहीही संबंध नाही; अशा अप्रचारास बळी पडू नये. तसेच, जर यावर कुणी दुसऱया संस्कृतीचा रंग चढवित असेल तर दक्षता घ्यावी. चैत्र शुल्क 1, 1933 (4 एप्रिल, 2011)ला शके सवंत प्रमाणे नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. तरी बौद्ध बांधवांनी हा बौद्ध परंपरेप्रमाणे साजरा करून संस्कृती जतन करावी.

राजेश पाटील
8097306700

जनगणना 2011 व भारत बौध्दमय बनविण्याचे आव्हान


जनतेचा महानायक 
भारतीय जनगणना 2010 चा पहिला टप्पा संपलेला असून त्यामध्ये कुटुंबांची गणना करण्यात आली होती. जनगणनेचा दुसरा व महत्वाचा टप्पा, 9 फेब्रुवारी 2011 पासून सुरु झाला असून या टप्प्यात व्यक्तींची गणना अर्थात जनगणना होत असून यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या धर्माची, जातींची तसेच भाषा आदींची नोंद करण्यात येणार आहे. याविषी बौद्ध समाजामध्ये असलेल्या मतमतांतराच्या पार्श्वभूमीवर बौद्धांनी नेमकी काय भूमिका घ्यावी हे ठरविणे आवश्यक झाले आहे.2001 च्या जनगणनेप्रमाणे भारतात बौद्धांची लोकसंख्या खरी आहे काय?2001 च्या जनगणनेनुसार भारतात बौद्धांची लोकसंख्या 79,55,207 अर्थात 0.8 टक्के आहे. परंतु वास्ताविकता अशी आहे की, फक्त महाराष्ट्रातच बौद्धांची लोकसंख्या 79,55,207 पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात विशेष करुन महार समाजाने बौद्ध धर्माचा स्विकार केला आहे. 2001 च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्या 59,78,912 आहे. यामध्ये 56.2 टक्के (31,91,548) बौद्ध, 43.7 टक्के (24,81,684) हिंदु आणि 0.1 टक्के (5983) शिख आहेत. याशिवाय 26,47,162 व्यक्ती बौद्ध आहेत. ज्यांच्या जातीचा उल्लेख नाही. ह्या सर्व जाती मिळनू 81,60,596 एवढी लोकसंख्या होते, जी 2001 च्या जनगणनेत दर्शविलेल्या बौद्धांच्या 79,55,207 लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. कर्नाटकात होलाया समाज (6,41,472) चे 34. 1 टक्के लोक बौद्ध आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश व पंजाब या राज्यात महार, होलाया, चमार इत्यादी समाजातील लोक आचार विचारांनी बौद्ध आहेत. या सर्वांची मिळून 1 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या होते. याचाच अर्थ 2001 च्या जनगणनेत भारतातील बौद्धांची लोकसंख्या  कमी दिसून येते व ती खरी नाही. धर्म बौद्ध का नोंदवला नाही?अनेक समाजाने व व्यक्तींनी बुद्धाचा धम्माचा स्वीकार केला आहे. विशेषत महार समाजाने धर्मांतर करुन बौद्ध धर्माचा स्वीकार केला असला तरी ही जनगणनेत बौद्ध धर्माचा उल्लेख सर्वांनी केला नाही. याचे सर्वज्ञात कारण म्हणजे आरक्षण जाण्याची भीती, हे होय. सरकार अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण देत होते पण धर्मांतरीत बौद्धांना नाही. त्यामुळे आचार विचार व संस्काराने संपूर्णत बौद्ध असलेल्या लाखो अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांनी निदान शैक्षणिक आरक्षण मिळावे ह्या अनिवार्य आशेपायी आपली पूर्वीची जात कायम ठेवली पण त्यांनी धर्म `बौद्ध' लिहीण्याचे टाळले. परिणामी महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या 7 टक्क्यांवरुन कमी होऊन 6 टक्क्यांवर झाली. अनुसूचित जाती/जमातींची अशीच कुचंबणा संपूर्ण भारतभर पहावयास मिळते. याचा परिणाम बौद्धांच्या लोकसंख्येवर झाल्याचे खालील तक्त्यावरुन स्पष्टपणे जाणवते.
बहुजनांनी जनगणनेत आपला धर्म बौद्धच का लिहावा?आज भारतातील विद्याथी परदेशात शिकायला जातात, पण 1000वर्षापूर्वी जेव्हापर्यंत धम्म जिवंत होता तेव्हापर्यंत परदेशातील विद्यार्थी भारतात शिकायला येत असत. विद्यापीठ ही संकल्पना भारताची जगाला देणगी आहे. नालंदा येथे 10,000 विद्यार्थी अभ्यास करीत असत. भगवान बुद्ध नंतर 1500 वर्षे हा कालखंड हा भारताचा सोनेरी इतिहास आहे. भगवान बुद्धांचा संघात जाती भेत नसल्यामुळे सर्व समाज घटकांचा समावेश असायचा, त्रिपिटक रचनाकार हे वेगवेगळ्या समाजातील होते. थेरीगाथा ही स्त्रियांनी केलेली पहिली रचना आहे. म्हणजेच सर्व समाज घटकांच उत्कर्ष हा बुध्दाच्या धम्मानेच झाला व आजही होऊ शकतो.बाबासाहेबांच्या मतानुसार, केवळ बौध्द धम्मानेच भारताचा व जगाचा विकास होऊ शकतो. बाबासाहेबांच्या मतानुसार (क) कालचे नाग संस्कृतीचे लोक आजचे हिंदू आहेत. नाग लोकांनी सर्वात अगोदर बौध्द धर्माचा स्विकार केला होता. (ख) महाराष्ट्र हा 100 टक्के बौध्द धर्मिय होता. (संदर्भ डॉ. आंबेडकर रायटींग एन्ड स्पीचेसः खंड 18 भाग 3 पृ., 560 व पृ. 421) (ग) अस्पृश्य लोक बौध्द धर्मीय होते. (संदर्भ ः अस्पृश्य पूर्वी कोण होते? (घ) सर्व भारतीय सांस्कृतिक दृष्टीकोनातून अगोदर बौध्द होते. (संदर्भ ः डॉ. आंबेडकर रायटींग एन्ड स्पीचेस, खंड 3 ब्राह्मणवादाचा विजय पृ. 275) (ड़) सम्राट अशोक शूद्र समाजाचे (ओबीसी) होते आणि बौध्दधमीय होते. (संदर्भ ः डॉ. आंबेडकर रायटींग एन्ड स्पीचेस ः खंड 3 शूद्र आणि प्रतिक्रांती पृ. 423) या आधारे असे म्हणता येते की, सर्व भारतीय विशेष करुन शुद्र (ओबीसी आणि अतिशूद्र (एससी/एसटी) आणि अतिशूद्र (एससी/एसटी) बौध्द धर्माचे अनुयायी होते. परंतु वेगळी ओळख नसल्याने स्वतःला हिंदू समजू लागले आणि स्वतंत्र ओळख न ठेवल्याने आपला धर्म व अस्तित्व हरवून बसले.मुस्लीम राज्यकर्ते सिंधू नदीपलीकडील बौध्द, जैन आणि ब्राह्मण धर्माच्या अनुयायांसाठी हिंदू या शब्दाचा वापर करीत असल्यामुळे हिंदूला स्थलवाचक शब्द पुढे धर्म या अर्थाने रुढ झाला. शूद्र (ओबीसी) आणि अतिशूद्र (एससी/एसटी) समाज आज जरी स्वतःला हिंदू समजत असले तरी त्यांची परिस्थिती गुलामासारखीच आहे. भगवत गीता (18.44) मनुस्मृतीसारख्या तथाकथीत पवित्र ग्रंथात शुद्रांना (ओबीसी) उच्च जातींची सेवा करण्यात सांगितले आहे. तसेच संपत्तीचा संग्रह आणि शिक्षणास प्रतिबंध केला आहे. शूद्र, वैश्य व स्त्री वर्गाला भगवदगीता (9.32) मध्ये पाप योनी संबोधले आहे. या सर्व गोष्टी गुलामगिरीची प्रतिके आहेत. ह्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेसह बौध्द धर्माची दीक्षा दिली आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली. ही ओळख कायम ठेवण्यासाठी धार्मिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी व जातीवादाच्या अंतासाठी बहुजनांनी (जातीवाद विरोधक, ओबीसी, अनु. जाती/जमाती) जनगणनेत धर्म `बौध्द' म्हणून लिहीणे अत्यंत आवश्यक आहे. सवैधानिक अधिकाराचं रक्षणबौध्द म्हणून नोंद केल्यास संवैधानिक अधिकार मिळणार आहेत का? सर्व संवैधानिक अधिकार धर्मावर आधारीत नसून जातीवर आधारीत आहेत. 1950 व 1990 च्या संवैधानिक नियमानुसार बौध्द धर्मामध्ये अनुसूचित जाती व जमातीचे लोक असू शकतात. त्यामुळे जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात बौध्द म्हणून नोंद केल्यास संवैधानिक अधिकार कायम राहणार आहेत. पण, धर्म बौध्द लिहिल्यावर जातीचा उल्लेख न केल्यास त्या व्यक्तिचा समावेश अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये होणार नाही. बौध्द समाजात 89.5 टक्के अनु. जाती, 7.4 टक्के, जनजाती, 0.4 टक्के ओबीसी व 2.7 टक्के इतर यांचा समावेश आहे. तरी धर्म म्हणून नोंद केल्यास संवैधानिक अधिकार कायम राहतात. जनगणनेत जातीचा उल्लेख का? सर्व संवैधानिक अधिकार धर्मावर नसून जातीवर आधारीत आहेत. ह्या अधिकारांचा कालावधी जरी ठरला नसला तरी हे अधिकार नेहमीकरीता नाहीत. भारतीय समाज हा अनेक जातीत विभागला आहे. ह्या समाजात व्यक्तीचा विकास त्याचा जातीच्या दर्जावर ठरलेला होता व आहे. छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा फुले व बाबासाहेबांना मिळालेली वागणूक, ही त्यांचे जिवंत उदाहरणे आहेत. त्यामुळे संविधानात हे अधिकार आर्थिक नव्हे तर जातीच्या आधारावर देण्यात आले. आजही ओबीसी, अनु.जाती/जमातीचा आर्थिक व शिक्षणाचा स्तर बघितला तर ह्या समाज घटकांना आरक्षणाची गरज आहे, हे लक्षात येते. महाराष्ट्रात महार-मांग समाजातील 50 टक्केपेक्षा जास्त लोक शेतावर मजुरी करतात. गरिबीच्या रेषेखाली जगणाऱयांच अनु. जाती/जमाती प्रमाण महाराष्ट्रात 40 टक्के पेक्षा जास्त तर भारतात 35 टक्केपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत आरक्षणाचे अधिकार अबाधित ठेवणे गरजेचे आहे. जातीचा उल्लेख न केल्यास त्या व्यक्तीची अनु.जाती/जमातीत होणार नाही व आरक्षणाच प्रमाण कमी होईल. महाराष्ट्रात 13 टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या असतांना सरकारी पातळीवर 10.2 टक्के नोंद आहे. ह्याचे कारण अनेक लोकांनी पूर्वाश्रमीची जात सांगितली नाही, हे होय. ह्या जनगणनेच्या निमित्ताने बाबासाहेबांचे भारत बौध्दमय करण्याचे स्वप्न काही अंशी पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आपणांस मिळत आहे. आरक्षण जाईल या भितीमुळे म्हणा पूर्वी जे झाले ते सर्व विसरुन जनगणनेत आपला धर्म बौध्द व जातीच्या रकान्यात (अनुसूचित जाती/जमाती असल्यास जी लागू असेल ती उदा. महार, चांभार) आपली जात लिहा. कारण 1950 व 1990 च्या संवैधानिक नियमांनुसार अनु. जाती/जमातींचे लोक बौध्द धर्माचे असू शकतात. त्यामुळे धर्म बौध्द लिहिल्यावर सुध्दा आपल्याला जातीचा उल्लेख करणे आवश्यक ठरले.आरक्षण व जातीवाद नष्ट करण्या संदर्भात बाबासाहेबांच मत  काही लोकांना बौध्द जातीच्या नोंदीमुळे जातीवाद पसरले अशी भीती वाटते व त्यामुळे जातीची नोंद करु नये व पर्यायाने आरक्षण/ संवैधानिक अधिकार नाकारावे असे सुचवितात. बाबासाहेबांनी संवैधानिक अधिकार व आरक्षण मिळावे यासाठी 1932 च्या गोलमेज परिषदेपासून संघर्ष केला. तसेच बौध्द धर्माची दीक्षा घेतल्यानंतर दि. 15 ऑक्टो.1956 या दिवशी आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेब म्हणाले होते की, `ते अधिकार मी मिळवून दिले. माझ्या लोकांना आरक्षण परत कसे मिळेल, यासाठी माझ्या पोतडीत अनेक उपाय आहेत.' अर्थात बौध्द धर्माच्या दिक्षेसह आरक्षण कसे कायम राहिल यासाठी ते जागरुक होते हे स्पष्ट होते.
 जातीव्यवस्था समाप्त करण्यासाठी रोटी-बेटी व्यवहार, ब्राह्मणांनी रचलेल्या ग्रंथांची पावित्रता नष्ट करणे, शूद्रातिशूद्रांचे जीवनमान उंचावणे, त्यांचा स्वाभिमान जागविणे, त्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा देवून स्वावलंबी बनविणे हे उपाय बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत. हे उपाय न केल्याने जातीवाद वाढेल. तेव्हा, फक्त जात लिहिल्याने जातीवाद वाढेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही.
राजकीय, शैक्षणिक तसेच सामाजिक आरक्षण (शासकीय योजना नोकऱया व आर्थिक तरतुदी) यासारख्या संवैधानिक अधिकार हे धर्मावर आधारीत नसून जातीवर आधारीत आहेत. जातीच्या उल्लेखाने बौध्द धर्मात जातीवाद वाढेल किंवा बौध्द धर्मात जातीच नाहीत, अशा भावनिक व सैध्दांतिक संभ्रमात राहणे हिताचे होणार नाही. केवळ जातीचा उल्लेख न केल्याने हिंदू, सिख, मुस्लीम व ख्रिस्ती धर्मांतून जातीवाद संपलाय का? ह्या प्रश्नांचे उत्तर नाही, हेच आहे. त्यामुळे केवळ जातीचा उल्लेख केल्याने जातीवाद वाढेल असे म्हणणे चुकीचे ठरते. उलट, संवैधानिक अधिकार मिळाल्याने लोकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावला आणि समाजातला जातीवाद काही प्रमाणात कमी प्रमाणात कमी झाला असे दिसून येते. हल्लीच्या काळात होणारा रोटी-बेटी व्यवहार हे याबाबतीतल जिवंत उदाहरण आहे. परंतु, अनु. जाती व जमातीच्या यादींमध्ये केंद्र व राज्य सरकारांनी सुधारणा केल्यास जातींच्या उल्लेखाची गरजच भासणार नाही.
महाराष्ट्रातील अनु. जातींच्या यादीचा घोळ :
महाराष्ट्र सरकारने जातीचे प्रमाणपत्र नवबौध्द/बौध्द म्हणून अनु. जातीचे दिले. पण अनु.जातीच्या यादीत उल्लेख केला नाही. त्यामुळे ज्यांच्या जवळ नवबौध्द/बौध्द म्हणून अनु.जातीचे प्रमाणपत्र आहे, त्यांचा जातीचा उल्लेख करतांना गोंधळ उडतो. तरी महाराष्ट्र सरकार अनु. जातीच्या यादीत दुरुस्ती करेपर्यंत धर्म म्हणून बौध्द नोंदणी करीत असतांना पूर्वाश्रमीचे जातीची नोंद करावी. तरी जनगणनेत तक्ता क्र. 2मधील जिह्यातील लोकांनी विशेष लक्ष द्यावे.

भाग - 3 पाली भाषेची नोंद
2001 च्या जनगणनेप्रमाणे भारतात पाली भाषा बोलणाऱयांची संख्या शून्य आहे. खरेतर आजची हिंदी म्हणजेच 2500 वर्षापूर्वीची पाली आहे. भगवान बुद्धांनी लोकभाषेत बिहारपासून पंजाबपर्यंत व नेपाळपासून मध्यपदेशपर्यंत धम्माचा पचार हा लोकभाषेत अर्थात पाली भाषेत केला. सम्राट अशोकांचे शिलालेख हे लोकभाषेत अर्थात पाली भाषेत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या 42 अभिलेख पैकी 36 भारतात, 2 नेपाळ, 2 पाकिस्तान व 2 अफगाणिस्तानमध्ये आहेत. हे अभिलेख महाराष्ट्र, कर्नाटक व ओरिसा या राज्यात सुद्धा मिळाले आहेत. या सर्वांची भाषा पाली आहे. (संदर्भ : सम्राट अशोक के अभिलेख). यावरुन पाली भाषेचा विस्तार सहज लक्षात येतो. 2500 वर्षापूर्वीची महाराष्ट्राची भाषा जर मराठी होती असे म्हटले तर, आजची हिंदी व पाली ह्या वेगळ्या कशा? फक्त, भाषेच्या नावात बदल झाल्याने भाषा बदलत नाही. भाषा ही कालानुरुप बदलत असते नष्ट होत नाही. अर्थात पाली हिच हिंदी व इतर उत्तर भारतातील भाषेची जननी आहे. किंबहुना त्या एकच आहेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. आज जागतिक स्तरावर नेपाळ, श्रीलंका, बागलादेश, म्यानमार, थायलंड, लाओस व कंबोडिया या देशात पाली ही साहित्यिक भाषा म्हणून वापरली जाते. भारतात इंग्रजी या भाषेचा पभाव मागील 200 वर्षात पचंड झालेला आहे, तर जागतिक स्तरावर पालीचा पभाव 1500-2000 वर्षात तिथल्या स्थानिक भाषेवर किती पडला असेल? त्या एकरुप झाल्या नसतील काय? ह्यावर विचार करणे व संशोधन होणे गरजेचे आहे. पाली भाषेचे महत्त्व ओळखून बाबासाहेबांनी पाली भाषेचा शब्दकोष तयार केला व संविधानात त्याची तरतूद केली. पालीभाषेच्या माध्यमातून आरोग्यशास्त्र, मानसशास्त्र तसेच भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा अभ्यास करता येतो.
पाली भाषा व आम्ही :
याशिवाय आमच्या प्रत्येक नवीन कार्याचा व प्रत्येक दिवसाचा आरंभ पंचशिल त्रिसरणाने होत असतो. पंचशिल व त्रिसरणाच्या गाथा पाली भाषेत आहेत. केवळ महामंगलसुत्त, जयमंगलअठ्ठगाथा, धम्मपालनगाथा अशा अनेक पाली गाथा कित्येकांच्या तोंडपाठ असून आमची कित्येक पाल्ये शाळा/कॉलेजातून पाली भाषा शिकत आहेत. धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी पालीची भाषा म्हणून नोंद होणे गरजेचे आहे. तरी या जनगणनेत भाषेचे तीन रकाने आहेत. या तीन पैकी मातृभाषा किंवा अन्य भाषांमध्ये `पाली' भाषा येते असा उल्लेख करणे आवश्यक आहे. 2001 च्या जनगणनेत ज्या भाषेचं नाव सुद्धा कधी माहीत नव्हतं. त्यांची नोंद आहे. जरी एक व्यक्ती असेल तरीसुद्धा पण पालीची नाही. बघा तक्ता क. 3 तरी पालीभाषेच्या अभ्यासकांनी व भन्ते यांनी पहिली भाषा व इतरांनी दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून पालिभाषेची नोंद करावी, तसे झाल्यास सरकारी पातळीवर पालिभाषेची दखल घेतली जाईल व धम्माच्या प्रसार मदत होईल. तेव्हा समस्त बहुजनांना सामाजिक जाणीवेतून एकच आग्रहाचे आवाहन करीत आहोत की 9 ते 28 फेब्रुवारी, 2011 होणाऱया जनगणनेच्या दुसऱया टप्प्यामध्ये आपल्या विषयीची माहिती देतांना आपला धर्म `बौद्ध' (रकाना 7) व जात (अनुसूचित जाती/जमाती नुसार जी लागू असेल ती रकाना 8 अ, 8ब व मातृभाषा (रकाना 10 किंवा अन्य भाषे (रकाना 11) मध्ये पाली भाषेचा समावेश करावा. जनगणना प्रगणकाने तशी नोंद केल्याची खात्री करुनच सही करा व इतरांना सुद्धा असाच मजकूर लिहायला सांगा. जेणे करुन, भारतातील बौद्धांची खरी संख्या दिसेल व त्या लोकसंख्येच्या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय आरक्षण मिळेल. पर्यायाने बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न काही अंशी पूर्ण होईल.

    आभार
राजेश पाटील
8097306700

 

Sunday 22 May 2011

महाराज्यांच्या नावाखाली काहीही

आमचा ओबीसींत समावेश करा - इति मराठा समाज

विचार
- प्रताप आसबे

देशात आणि देशाबाहेरही विविध क्षेत्रांत मराठा समाज कर्तृत्वाच्या जोरावर ताठ मानेने उभा आहे. तरीही आमचा ओबीसींत समावेश करा, अशी मागणी केली जात आहे.

..........

हे राज्य मराठ्यांचे नव्हे, मराठी माणसांचे असेल, असे विधान राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणताना केले होते. चव्हाण हे मराठा होते. तरीही हे राज्य केवळ मराठ्यांचे असणार नाही व ते तमाम मराठी माणसांचे असेल, असे त्यांनी सांगितले होते. हे मराठा समाजाने कायमचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या मराठी माणसांतही महात्मा फुले यांच्या बहुजन समाजाच्या व्याख्येनुसार जो रंजला गांजलेला समाज आहे त्याच्या सर्वंकष कल्याणाला त्यांनी प्राधान्य दिले होते.

महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या किती किंवा कोणत्या जातीची संख्या किती हे ठामपणाने सांगता येत नाही. कारण १९३१ नंतर जातीनिहाय खानेसुमारी झालेली नाही. तरीही महाराष्ट्रात कोणत्याही जातीपेक्षा मराठा जातीचे संख्याबळ अधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे. मराठा ही जात अथवा जातसमूह शेती आणि सैन्य यांच्याशी संबंधित होती. पंचकुळी, शहाण्णवकुळी हे घटक वतनाशी संबंधित होते तर वतनाशी संबंधित नसलेले पण शेती करणारे कुणबी किंवा कुळवाडी यांचाही समावेश मराठ्यांत केला जात असल्याने समाजशास्त्रीयदृष्ट्या मराठा जातीला जातसमूह म्हणजेच क्लस्टर ऑफ कास्ट असेही मानतात. लग्नाच्या बाबतीत पदर लागतो का हे पूर्वी पाहिले जात असे, काही प्रमाणात आजही पाहतात. पण कोण कोणत्या पदावर, हुद्यावर, किती मालदार, किती शिकला, काय करतो याला हल्ली पदरापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे पंचकुळी, शहाण्णवकुळी आणि शेतीशी संबंधित असलेले इतर मराठा यांच्यात हल्ली विवाहसंबंधही होतात. अनुलोमच नव्हे तर प्रतिलोमही. पंचकुळी व शहाण्णव-कुळीचा सुंभ जळाला आहे, पण पीळ थोडाफार कायम आहे, विशेषत: पंचकुळीत. पण काळाच्या ओघात मराठा नावाचा जातसमूह आता जात या संकल्पनेत समाविष्ट झाला आहे. पूर्वी ज्यांना मराठा न्हावी, मराठा परीट आणि निव्वळ कुणबी म्हटले जायचे, या जाती मराठा जातीपासून वेगळ्या झाल्या. त्यांना मराठा समाजाने स्वीकारले नसावे. या जाती मराठा जातसमूहापासून काही अंतरावर होत्या. कालांतराने या जातींचा समावेश इतर मागास समाजात झाला.

मराठ्यांचे संख्याबळ जास्त असले तरी वतनदार वगळता शेती आणि सैन्याशी संबंधित असलेला बाकीचा समाज हा दारिद्यातच होता. अख्ख्या बहुजन समाजालाच शिक्षणाचा गंध नव्हता. त्यामुळे एकोणिसाव्या शतकात अनेकांनी शिक्षण प्रसाराच्या चळवळीत झोकून दिले. बहुजन समाजाची शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती. जातीचे अडथळेही होते. त्यामुळे जातवार बोर्डिंग सुरू करण्यात आली. शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. गरीब ब्राह्मण शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी माधुकरीची पद्धत होती. तशी इतर समाजात तरतूद नव्हती. पण ब्राह्माण समाजातील हा आदर्श पुढे काही वतनदार मराठ्यांनी घेतला. तेही गरीब बहुजन समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आपल्याकडे शिक्षणाला ठेवून घ्यायला लागले. शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भगीरथ प्रयत्नांनी शिक्षणाची गंगाच महाराष्ट्रात आणली म्हणून बहुजन समाजाला शिक्षणाचा परिसस्पर्श झाला. तिथूनच बहुजन समाजाच्या भौतिक प्रगतीची घोडदौड सुरू झाली.

यशवंतराव चव्हाणांनी सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मराठेच नव्हे तर बहुजनांतील प्रत्येक दीनदुबळ्या समाजाला सत्तेत सहभागी करून घेण्याचे धोरण घेतले. म्हणून साता-यासारख्या मराठ्यांच्या बालेकिल्ल्यातही परीट, न्हावी अशा इतर मागास समाजातील कार्यकर्त्यांना तिकीट देऊन सत्तेत सहभागी करून घेतले. प्रतिष्ठा दिली. बळ दिले. त्यासाठी पंचकुळीच्या अहंकाराचीही त्यांनी तमा केली नाही. उलट अशांना त्यांनी खड्यासारखे राजकारणातून बाजूला केले आणि हे ख-या अर्थाने बहुजन समाजाचे राज्य आहे, हे जगाला दाखवून दिले. त्याच यशवंतरावांना तथाकथित कुलीन मराठ्यांनी खाजगीत हीनकुळाचे ठरवायलाही कमी केले नव्हते. पण यशवंतरावांनी त्यांना भीक घातली नाही. कुणबी असो की परीट, न्हावी असो की भंडारी, माळी, बौद्ध, मातंग अशा अठरापगड घटकांची मोट बांधली. फुल्यांच्या संकल्पनेतील बहुजन समाजाची एकजूट घडवून त्यांनी या समाजाला ताठ मानेने उभे केले.

बहुजन समाजात मराठ्यांचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे शिक्षणाचे, प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे आणि राजकारणाचेही सर्वाधिक फायदे या समाजाला मिळाले. त्यामुळे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या समाजाला मिळाली. तीही बहुजन समाजातील इतर घटकापेक्षा अधिक. तालुका पंचायतीपासून जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, विधिमंडळ, संसद व सत्तेत सगळ्या पातळ्यांवर या समाजाला कोणाहीपेक्षा कितीतरी जास्त प्रतिनिधित्व आहे. नोकऱ्यांतील प्रमाण कोणाहीपेक्षा जास्त आहे. पण राजकारण आणि सत्ताकारणाच्या पलीकडेही शिक्षणक्षेत्रात, कारखानदारीत, उच्चशिक्षणात, प्रशासकीय सेवेत, लष्करात, तंत्रज्ञानात, ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात, संशोधनात, देशात आणि देशाबाहेरही विविध क्षेत्रांत मराठा समाज कर्तृत्वाच्या जोरावर ताठ मानेने उभा आहे. हे फुले-आंबेडकर-शाहूंपासून यशवंतरावांपर्यंत झालेल्या प्रयत्नांचे फलित आहे.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की राजकारणाशी संबंधित असलेल्या बहुतेक मराठ्यांनी हे आदर्श कधीच झुगारून दिलेले आहेत. गुणवत्तेच्या बुद्धिभेदावर राजकीय फायदे उपटण्याचा प्रकार प्रथम यांनीच सुरू केला. आर्थिक निकषावर राखीव जागांची मागणी करीत बहुजन समाजात फूट पाडली आणि जात व धर्मावर आधारलेले फॅसिस्ट तत्त्वज्ञान गावागावात नेले. गरीब आणि बेरोजगार मराठ्यांची माथी भडकावून दीनदलित दुबळ्या समाजाला लक्ष्य केले. सहकार व राजकारणातील मराठ्यांनी तर बहुजन समाजातील इतर घटकांचे हक्क नाकारून कुटुंब आणि गोतावळ्याच्या दावणीलाच सगळी सत्ता बांधली आहे.

गरिबी, अशिक्षितपणा सगळ्या समाजात आहे. मराठा समाजाने मोठी प्रगती केलेली असली तरी मराठ्यांमध्ये गरिबांचे प्रमाण मोठे आहे. पण आजही जातीच्या उतरंडीप्रमाणे आपण खालीखाली गेलो तर दारिद्य, अशिक्षितपणा याचे अधिकाधिक विदारक चित्र दिसते. अख्ख्या जातीत एखादा टक्का सुस्थितीत दिसतो. भटके-विमुक्त-आदिवासींत एखादाच सुशिक्षित व सुस्थितीत आढळतो. बहुजन समाजाच्या तळाशी जसजसे जाऊ तसतसे दारिद्याचे चित्र गडद होत जाते. याकडे आता कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

उलट आपल्यातील गरिबीचे भांडवल करून सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठेला मुकलेल्या घटकांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मराठा समाजातील कुणबी समजाचा आणि त्यांचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी केली जात आहे. दडपण आणण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबिले जात आहेत. खरे म्हणजे महाराष्ट्रात अभिजन ब्राह्मण वगळता उरलेले बहुजन शूद्रातिशूद्र होते. क्षत्रिय होते की नव्हते याबद्दल वाद आहेत. पण ब्राह्मण पुरोहितशाहीच्या नादी लागून मराठ्यांनी क्षत्रियत्वाचे दावे केले, ही वस्तुस्थिती आहे. आज तेच मराठे आम्हाला कुणबी समजा आणि ओबीसीत समावेश करा, अशी दुटप्पी मागणी करू लागले आहेत. यामुळे तमाम मराठी समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तासंपत्तीच्या केंद्रीकरणामुळे इतर सगळ्या समाजांत मराठ्यांविषयी तिटका-याची भावना वाढत आहे. अशावेळी काहीजणांनी गरीब मराठ्यांना भडकावण्याचे उद्योग सुरू केले आहेत. त्यांना मराठा धनदांडग्यांशी लढवण्याऐवजी गरिबांच्या पंगतीतील पत्रावळ्या ओढण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यातून उद्या गरीब मराठ्यांचे कल्याण होण्याऐवजी अख्ख्या बहुजन समाजातच अराजक माजणार आहे. एका बाजूला शिवाजी महाराजांचे, शाहूंचे नाव घ्यायचे आणि दीनदलितांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवायचा, ही या प्रभृतींची बदनामीच आहे. त्यापेक्षा छत्रपती शिवाजी, शाहू आणि यशवंतराव हे आमचे कोणी लागत नाहीत, इतके तरी जाहीर करा. तेवढेच त्यांच्यावर उपकार होतील.

म. फुले यांनी मांडलेली बहुजन समाजाची संकल्पनाच मोडीत निघण्याची भीती आहे...

- प्रताप आसबे


महाराष्ट्रातील जाती जातीत असलेले सामंज्यस्य कसे धोक्यात आले आहे, याचे बटबटीत स्वरूप लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होते. खरे म्हणजे सामंजस्य धोक्यात आले यापेक्षा जाती जातीत असुया आणि तेढ निर्माण झाली, हे म्हणणे सयुक्तिक ठरेल. यातून राज्याचे सामाजिक स्वास्थ्य कसे बिघडले आहे, हे स्पष्ट होते. निवडणुकांचे निकाल काहीही लागोत, पण सामाजिक स्वास्थ्य बिघडणे हे बरे लक्षण नाही.

राज्यात एकेकाळी स्पृश्यास्पृश्य असे भेद होते. स्पृश्यांनी अस्पृश्यांना गावकुसाबाहेर लोटून जगण्याचे सगळे अधिकार आपल्याकडे केंदित केले होते. सत्ता, संपत्ती आणि ज्ञान यावर मूठभरांची मक्तेदारी होती. स्पृश्यांची सेवा आणि त्यांनी टाकलेल्या तुकड्यांवर त्यांना गुजरण करण्याचा अधिकार होता. त्यामुळे अतिशय हीन आणि लाचारीचे जीणे हा समाज जगत होता. गावकुसाच्या परिघामध्ये राहणाऱ्या स्पृश्यांमध्येही उच्चनीच जातींची उतरंड होती. तीही शोषणावर आधारित होती. एकूण समाजव्यवस्था हीच पराकोटीच्या शोषणावर आधारित होती. पुढे समाजसुधारकांनी अविरत प्रबोधन करून आणि वर्षानुवषेर् लढे देऊन ती व्यवस्था खिळखिळी केली. समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वज्ञानाच्या आधारावर नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शोषणाला खतपाणी घालणाऱ्या रूढी आणि प्रथापरंपरांवर हल्ले चढविले. ज्यांच्या हातात सगळे अधिकार एकवटले होते त्या शाशक आणि शोषक जातींनीही निकराचा प्रतिकार केला. तेव्हा सुधारकांनी शोषितांमधील भेदाभेद आणि दुरावे नष्ट करून त्यांच्या एकजुटीची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अठरापगड जाती, बारा बलुतेदार, स्पृश्य -अस्पृश्य आणि विशेषत: स्पृश्यांमधील शेतकरी, कष्टकरी जातींची एकजूट उभी राहिली. त्या एकजुटीलाच बहुजन समाज असे म्हटले जाई. बहुजन समाजाची व्याख्या मांडली ती महात्मा जोतिबा फुले यांनी. पाच एकराखाली असलेले सगळे स्पृश्यास्पृश्य आणि दीनदलित कष्टकरी यांचा समावेश त्यांनी बहुजन समाजात केला होता. पुढे हेच बहुजन स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. त्यामुळे चळवळीला बळ लाभले. सामाजिक सुधारणांबरोबर स्वातंत्र्यासाठी झालेल्या राजकीय चळवळीनेही लोकांना मूलभूत हक्कांची जाण आली.

स्वातंत्र्योत्तर काळात सत्ता आली, बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटने तील  कायद्या  मुळे  सगळे समान ठरले. ती थेट बहुजन समाजाच्या हातात गेली. नवीन कायदे झाले. विकासाला गती मिळाली. बहुजन समाजातील नेते सर्व जातीजमातींना बरोबर घेऊन कारभार करत होते. सत्तेच्या या राजकारणात वतनदार मराठ्यांचा फारसा सहभाग नव्हता. खरेतर त्यांना शिरकाव करायला जागाच नव्हती. निवडणुकांच्या राजकारणात बहुजन समाजातील सामान्य जातीजमाती आणि बलुतेदार घटकातील कार्यकर्ते सुद्धा  इतके तगडे होते की राजघराणे आणि पंचकुळीतील उमेदवारांनाही ते बघता बघता चारीमुंड्या चीत करत होते. सत्तेच्या समन्यायी वाटपाचा हा समतोल बरीच वर्ष राज्यात कायम होता. पुढे सत्तेचे केंदीकरण, त्यातून कलेकलेने वाढत गेलेली माया, विचाराच्या बांधिलकीला येऊ लागलेली ढिलाई, सत्तेसाठी हव्या तशा केलेल्या तडजोडी आणि सत्तेची अमर्याद हाव यामुळे बहुजन समाजाच्या हाती असलेली सत्ता धनदांडग्यांच्या हाती कधी गेली हे कळले नाही. त्यात सत्तेच्या समन्यायी वाटपाचा समतोलच ढळून गेला.

बहुजन समाजात आता मराठा, माळी, धनगर, वंजारी, कुणबी, कोष्टी अशा अठरापगड जातींनी आकार घेतला होता. दलितांतही आता बौद्ध, मातंग, चांभार या जातींना जातीची प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळे या सर्वांनी बनलेला बहुजन समाज मिथक ठरला आणि मराठा, माळी, धनगर अशा जाती वास्तव म्हणून उरल्या.

सत्तेत असलेले मराठे सर्वंकष सत्तेसाठी आंधळे झाले. आपण, आपला मुलगा, सून, नातू, भाऊ, भाचा या सर्वांवर सदासर्वकाळ सत्तेचे छत्रचामर राहिले पाहिजे. पंचकुळ्यांना त्याची भावकी, देशमुखाला त्याची देशमुखी आणि पाटलाला पाटलाशिवाय सगळेच शत्रू वाटायला लागले. सत्तेत असलेल्या माळ्यांना माळ्यांच्या पलीकडचे कोणी दिसेना. धनगरांचे लाभाथीर् धनगरच ठरायला लागले. ही अधोगती इथपर्यंतच नाही तर पोटजातीपर्यंत गेली. हिंदुत्वाच्या वाऱ्याने दलितांत हिंदू दलित आणि बौद्ध अशी फूट पाडली.

वातावरण अशारीतीने कमालीचे कलुषित झाले होते. तशात ज्या मराठ्यांना प्रयत्न करूनही सत्तेत शिरकाव करता येत नव्हता, अशा असंतुष्टांनी मराठ्यांना राखीव जागा देण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. सत्ता, संपत्ती, जमीनजुमला, नोकऱ्या यामुळे प्रबळ झालेल्या जातीनेच राखीव जागा मागायला सुरुवात केल्यावर बहुजन समाजातील कलहाला तोंडच फुटले. मराठ्यांच्या विरोधात बहुतेक ओबीसी जाती एक झाल्या. ओबीसी जाती आपल्या विरोधात एकत्र येताहेत हे पाहून मराठ्यांनीही काही ठिकाणी जातीच्या पातळीवर एकत्र येऊन धडा शिकविण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाचे विदारक स्वरूप पाहायला मिळाले.

वास्तविक मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला बहुतेक मराठ्यांचा विरोध असल्याने हा समाजही दुभंगलेलाच होता. त्याचे प्रत्यंतर बीड आणि नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये केवळ माळी समाजाच्या हितसंबंधानाच प्राधान्य दिले जाते, यामुळे इतर ओबीसी जातींतही असंतोष होता. त्या असंतोषाचे नेतृत्व काही प्रबळ मराठ्यांनी केले. मराठा समाजातील एका गटाबरोबर काही ओबीसी जातींतील मतदारांनीही मनसेला एकगठ्ठा मते दिली तर काहींनी सेनेच्या उमेदवाराला पसंती दिली. तर मराठा समाजातील एका लहान गटाने राष्ट्रवादीला मतदान केले. बीडमध्ये मराठा विरुद्ध इतर सगळ्या ओबीसी जाती अशी लढत झाली. ती अगदी पक्षातीत झाली. अगदी थोडे मतदारसंघ असतील की जिथे जातीपातीचा प्रभाव फारसा जाणवला नाही. माढ्यात धनगर समाजाचे मोठे मतदान आहेे. पण त्यातील बहुतांशी मतदान शरद पवारांना झाले असावे. अन्यथा तीन लाखांवर मताधिक्य दिसले नसते. अर्थात सामाजिक प्रश्ानंबद्दल त्यांची भूमिका संशयातीत असल्यानेच जातीचे राजकारण तिथे निष्प्रभ ठरले असेल. पण अशी उदाहरणेही बोटावर मोजण्याइतपत आहेत. जातीपातीचे राजकारण राखीव झालेल्या मतदारसंघांतही मोठ्याप्रमाणात झाले. रामटेकमध्ये मेणबत्ती की अगरबत्ती, असा सांकेतिक भाषेत प्रचार झाला. बौद्ध समाजाचे लोक आंबेडकर जयंतीला मेणबत्त्या लावतात आणि हिंदू दलित देवदेवतांपुढे अगरबत्त्या लावतात. त्यामुळे बौद्ध उमेदवाराऐवजी हिंदू दलित उमेदवाराला मते द्या, असे सांगण्याचा प्रकार होता. अमरावतीत निळा गुलाल नको भगवा गुलाल पाहिजे, असा प्रचार झाला. जयभीम की रामराम, ही भाषा शिडीर्त झाली. थोडक्यात सांगायचे तर हिंदू मतदारांनी हिंदू दलित उमेदवारांना मते द्यावीत असे सांगून बौद्धांना एकटे पाडण्याचा सर्रास प्रयत्न झाला. यात बहुजन समाजातील प्रबळ जातीचा मोठा वाटा होता. एरवी पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात निवडणुका लढल्या जातात. उमेदवार योग्य की अयोग्य, यावरही त्या होतात. पण यावेळी फार मोठ्या प्रमाणात पक्ष आणि उमेदवारापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे, हे लक्षात घेऊन जाती जातीत राजकारण झाले. याला मराठ्यांसह कोणतीही जात अपवाद नाही. त्यामुळे बहुजन समाज ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. यातील अधाशी घटकांना बाजूला करून सामाजिक सामंज्यस्य निर्माण केले नाही तर म. फुल्यांनी मांडलेली बहुजन समाजाची ही संकल्पना इतिहासजमा झाली तर आश्चर्य वाटायला नको.

हिन्दुनी बळकावली जैन-बौद्ध मंदिरे.....!

मुस्लिमांनी अनेक हिन्दू  मंदिरे पाडून त्याजागी मशीदी बांधल्या असा हिंदुत्ववाद्यांचा  एक लाडका सिद्धांत आहे. बाबरी मशिदीच्या जागी आधी राम मंदिर होते, व बाबराने ते पाडून तिथे बाबरी मशीद बांधली असेही हे लोक छातीठोक पणे सांगत  असतात.

मुस्लिमांनी काय केले हे आपण थोड़ा वेळ बाजूला ठेवू. पण  खुद्द हिंदुत्ववाद्यांनी  भारतातील अनेक जैन व बौद्ध गुफा, लेणी,  मंदिरे चक्क बळकावली  व त्यांचे हिन्दूकरण केले या विषयाची चर्चा होणे फार गरजेचे आहे.

भारतात आपण कोणत्याही ठिकाणी उभे राहिलात आणि ५० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पाहिलेत, तर तुम्हाला  सगळ्यात जूने  अवशेष हे जैन किंवा  बौद्धांचेच दिसतील. महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या किल्ल्यांवर बौद्ध लेणी दिसतात.   खुद्द पुणे जिल्ह्यातच कार्ले, भाजे, जुन्नर, लेण्याद्री  या ठिकाणी तुम्हाला प्राचीन बौद्ध लेणी दिसतील. याउलट हिंदूंची जी कांही 'जूनी' धार्मिक ठिकाणे आहेत,  ती फार नंतरची आहेत, आणि तीही बौद्धान्च्या लेण्यात घूसखोरी करून बनवण्यात आली आहेत.  याची कांही उदाहरणे म्हणजे खुद्द पुण्यातील पातालेश्वर लेणी, कार्ल्याची एकवीरा देवी आणि लेन्याद्रीचा गणपती ही आहेत. अगदी अशीच स्थिती महाराष्ट्रभर आणि देशभर आहे.


पंढरपूरच्या विठ्ठलाचे  मंदिर मूळ जैन किंवा बौद्ध मंदिर असावे याचे अनेक पुरावे आहेत. इतकेच नव्हे तर कोल्हापूरच्या  महालक्ष्मीचे मंदिर हे मूळ पद्मावती देवीचे जैन मंदिर होते ही गोष्ट तुम्हाला कोणताही निष्पक्ष इतिहासकार सांगू शकेल. तुम्ही स्वत: कोल्हापूरला या मंदिरात गेलात आणि मंदिरातील शिल्पांचे बारकाईने निरीक्षण केलेत तर तुम्हालाही हे जैन मंदिर होते हे सहज समजू शकेल. तेथे असलेल्या जैन खाणा-खुणा बुजवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, ही गोष्ट हे जैन मंदिर होते असेच सिद्ध करते.

महाराष्ट्रातीलाच सातारा जिल्ह्यातील फलटन येथे जबरेश्वराचे मंदिर आहे. ते आधी जैन मंदिर होते हे तुम्ही स्वत: ओळखु शकता.

अशा कनव्हरटेड  मंदिरांची संख्या शेकडोंनी  आहे. आज हिन्दू मंदिरे म्हणून ओळखल्या  जाणा-या  कांही प्रसिद्द मंदिरांमध्ये जगन्नाथपुरी (ओरिसा, हे मूळ जैन मदिर होते व ते जैन धर्माचे यादवकुलीन तीर्थकर नेमिनाथ यांच्याशी संबधीत होते),  तिरुपती बालाजी (आंध्रा प्रदेश, हे देखील मूळ जैन मदिर होते व ते  तीर्थकर नेमिनाथ यांच्याशी संबधीत होते) व बद्रीनाथ (उत्तरांचल,   हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर  रु षभ यांचे मंदिर होते, आता ते शिव मंदिर आहे) ही मंदिरे आहेत.

बौद्ध गयेचे प्रसिद्द मंदिर बौद्धांचे असुनही आज देखील हिंदूंच्या ताब्यात आहे व ते त्यावरील आपला ताबा सोडायला तैयार नाहीत. 

बाबरी मशीद येथे अगोदर राम मंदिर होते याचे पुरावे हिंदुत्ववादी देवू शकले नाहीत. भाजप सरकारने कोर्टात जे पुरावे दिले ते तेथे जैन मंदिर होते याचे दिले! पुढे तेथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले, त्यांनाही  तेथे जैन अवशेषच  सापडले!


जैन व बौद्ध मंदिरांचे रूपान्तर हिन्दू मंदिरांत कसे झाले याच्या सुरस कथा आपल्याला शिवलीलामृत या पोथीत वाचायला मिळतील.
पांडव लेणी हा शब्द आपण ब-याचदा ऐकला-वाचला असेल. कांही पांडव लेणी आपण स्वत: बघितलीही असतील. ही  पांडव लेणी पांडवांनी  एका रात्रीत बनवली अशी एक भाकड कथा सांगितली जाते. त्या भाकडकथेचा अर्थ एवढाच की कोणीतरी एक रात्रीत त्या लेण्यात घुसखोरी करून ती आपल्या ताब्यात घेतली, आणि तिथे आपले देव बसवले.





-महावीर सांगलीकर

http://mahavichar.blogspot.com/2011/04/conversion-of-buddhists-temples.html


आभार
प्रशांत म. गायकवाड


आपला महाराष्ट्र शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता

आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातन काळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील . भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत . हि लेणी म्हणजे बौद्ध भिक्शुंची राहण्याची ठिकाणे होती . हेच त्यांचे निवाऱ्याचे स्थान होते महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत , असे सांगण्यात येते . परंतु विराटनगरी कोठे पांडवांचे राज्य कोठे ?

ब्राम्हणांनी भूलविण्यासाठी बुद्धाच्या नावाचा लोप केला.  

मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी हि पांडव लेणी असल्याचे सांगतात . 
इकडे  ‘पांडव’ कशाला आले होते ...!
पांडव दिल्लीच्या बाहेर ८० मैलाच्या पलीकडे कधी गेलेच नाहीत?
त्यांनी अलवार स्टेट मध्ये पंधराशे लेणी खोदली कशी?
त्यांच्याजवळ टीकास न्हवती की पावड न्हवत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार , खंड ६
पान क्रमांक :- ७४ व ७७


आभार
प्रशांत म. गायकवाड

दगडाचा देव, दगडाचे भक्त

विचार
स्वप्ना पाटकर


उपास-तापास, नवस आणि जागरणांचा ’सीझन’ आहे. जो तो देवाला खूश करायच्या मागे लागला आहे. कुणी बाबांच्या वाऱ्या करतात, तर कुणी दर्शनाचा अतिरेक करतात. उपासाच्या नावाखाली पोट फाटेस्तोवर उपासाचे पदार्थ खाल्ले जातात. जागृत मानल्या जाणाऱ्या स्थळांवर मोठमोठे नवस मागितले जातात. अवडीच्या गोष्टी सोडणे, मंदिरांना दान देणे, आठवड्यात एक चक्कर टाकणे हे सर्वही त्याचबरोबर सुरू होते. या सर्वांचे कारण एकच - ’स्वार्थ’. काहीतरी हवे, काहीतरी मिळावे म्हणून देवाला याप्रकारे मस्का मारला जातो. असेच भिकाऱ्यासारखे हात पसरत माणूस सारखे काही ना काही मागत राहतो. गाडी, बंगला, चांगली नोकरी... ही यादी संपत नाही. मात्र भीक मागण्यात आयुष्य संपून जाते. आपले कुटुंब, ऑफिसमधील सहकारी, मुले, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक यांच्या मनाचा, विचारांचा, गरजांचा विचार करायला वेळच उरत नाही. दगडासमोर डोकं टेकण्यात तल्लीन झालेला मनुष्य जिवंत जीवांना विसरून जातो. अशाने देव अजिबात खूश होत नाही. दुसऱ्यांची मने दुखवणाऱ्यांवर देव खूष होईल तरी कसा! घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवासमोर उभे राहायला दोन मिनिटं नसणारे लालबागच्या राजासमोर सात तास राम्ग लावतात. याला भक्ती म्हणत नाहीत. स्वामी विवेकानंदांनी म्हटले तेचे खरे - मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे.

आपल्या अवतीभोवती असलेल्यांची मने सांभाळा, सर्वांशी प्रेमाने वागा, जगावर थोडा विश्वास ठेवा. ही खरी पूजा. चोर वाईट लोक भेटले की सगळेच वाईट दिसू लागतात. दोन दु:खद प्रसंग घडले की, नशीब खोटे वाटू लागते. नजर जाईल तिथे खोटेपणा, लबाडी आणि त्रास पाहण्याची सवय होते. मनात कपट, द्वेष, शंका आणि लबाडी ठेवून केलेली पूजा ही पूजा नसून वेडेपणाच आहे. स्वच्छ, शांत आणि प्रेमळ मन हा भक्तीचा पाया, बाकी सगळे नंतर. इमारतीचा चाळीसावा माळा कुणालाही भावेल, पण त्यासाठी पायाही मजबूत हवाच ना. पूजा, उपास, नवस वगैरे आयुष्याच्या इमारतीतला चाळीसावा माळा आहे. अत्यंत देखणा आहे, पण स्वशुद्धीचा पाया आधी नीट बाधुन घ्या. वाईटाने माखलेले मन घेऊन कोणत्याही देवळात गेलात, कितीही उपास केलेत किंवा कोणताही नवस मागितलात तरी पदरी निराशाच येणार. बनवणाऱ्याला चालवता येते, देवाकडे ’करप्शन’ हा प्रकार चालत नाही. तिथे लाच देऊन चांगले आयुष्य घेता येत नाही. तिथे चालते फक्त मनुष्यप्रेमाचे नाणे.
देवाने बनवलेल्या सृष्टिवर व त्याने आकारलेल्या मनुष्यावर प्रेम करणाऱ्यांची इथे हुकुमत असते हे समजून घ्या.
देव दगडाचा जरी दिसत असला तरी दगडाचे भक्त बनू नका?
आभार
प्रशांत म. गायकवाड

एक स्वप्न पुन्हा नालंदा नांदण्याचे....!

विचार
सुरेश भटेवरा 

साऱ्या जगाला अभिमान वाटावे असे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आजच्या बिहारच्या भूमीत नालंदात होते. जगभरातून आलेले साडेआठ हजार विद्यार्थी  आणि दीड हजार विद्वान अध्यापक असणारे हे विद्यापीठ धर्मांध मोहम्मद बख्तियार खिलजी या आक्रमकाने पेटवले. इथला अपार ग्रंथ संग्रह तेव्हा सतत सहा महिने जळत होता. इथल्या गुरुजनांचा या आक्रमणात बळी तरी गेला किंवा ते परागंदा तरी झाले. 'नालंदा' या भारताला अभिमान वाटणाऱ्या इतिहासाची उजळणी करण्यासाठी त्याच जागी आता नालंदा विद्यापीठ नव्याने उभे राहते आहे. त्यासाठी पुढाकार घेताहेत नीतिशकुमार आणि अमर्त्य सेन. नालंदाला भेट देऊन टिपलेली ही निरीक्षणे.

...

दुपारचे दोन. सूर्य डोक्यावर तळपत होता. तापमान ४२ डिग्री असावे. वाटेत नालंदाचा फलक वाचला. मनात कुतूहल निर्माण झाले. नालंदा विद्यापीठाविषयी आजवर बरेच ऐकले होते. एकदा नालंदात जावे आणि विद्यापीठाचे अवशेष पहावेत, अशी उत्कंठा अनेक वर्ष मनात होती. लोकसभेची निवडणूक कव्हर करण्यासाठी बिहारमधे हिंडत होतो. योग जुळला. ज्या भूमीने अनेक शतकांपूर्वी साऱ्या जगाला ज्ञानसाधनेची शीतल छाया दिली, त्या पवित्र जागेचे दर्शन घ्यावे, असे वाटले. वाट वाकडी करून नालंदात शिरलो. विद्यापीठाचा इतिहास समजावून घेण्यासाठी गाइड शंभुनाथ मिश्रांना सोबत घेतले. नालंदाच्या खंडहरात मिश्रांची रनिंग कॉमेंट्री ऐकताना, मनाचा प्रवास भूतकाळाच्या दिशेने सुरू झाला. पंधरा शतकांपूवीर्चे दृश्य थेट डोळ्यासमोर उभे राहिले.


जगाच्या ज्ञान परंपरेत बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे स्थान अतुलनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हे जगातले पहिले विद्यापीठ. सलग आठ शतके साऱ्या विश्वात नालंदा ही ज्ञानदानाची तपोभूमी होती. केवळ भारतच नव्हे तर चीन, कोरिया, तिबेटसह जगातले हजारो विद्याथीर् ज्ञानार्जनासाठी इथे यायचे. प्रवेशासाठी त्यांना कडक प्रवेशपरीक्षा द्यावी लागे. दहापैकी दोनतीन विद्यार्थ्यांची निवड व्हायची. साहित्य, तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र, अंकगणित, दंडनीती, ज्योतिषशास्त्र, योगविद्या, व्याकरण, चित्रकला, शिल्पकला, मंत्रविद्या, वेदविद्या तसेच बौद्ध आणि जैन संप्रदायांची शिकवण इथे दिली जायची. सत्याच्या शोधाची पहिली अट असते स्वातंत्र्य. हा नालंदाचा मानदंड. रोज इथे १०० व्याख्याने होत. एकाच वेळी ८५०० विद्यार्थी
, विविध कलांमध्ये पारंगत व्हायचे. त्यांना शिकवण्यासाठी विद्यापीठात तब्बल दीड हजार अध्यापक होते. इथले अभ्यासक्रम प्रगत, उदार आणि बहुव्यापी होते. विविध कलासंस्कार शिकवणाऱ्या नालंदात सांप्रदायिकता नव्हती. रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजक अशा तीन देखण्या इमारतींमध्ये ग्रंथालय होते. या परिसराला धर्मगंज म्हणत. जगातल्या अनेक विषयांची अलौकिक ज्ञानसंपदा इथे होती. नालंदा निवासी विद्यापीठ असल्याने विद्यार्थी आणि अध्यापकांसाठी हजारो स्वतंत्र खोल्या होत्या. या वसतिगृहांच्या भिंती रूंद असल्याने हिवाळ्यात खोल्या उबदार तर उन्हाळ्यात थंड राहात. निवासाबरोबर विद्यार्थ्यांना भोजन, कपडालत्ता, औषधोपचार सारे विनामूल्य मिळायचे. कनोजचे राजे हर्षवर्धन आणि पाल राजांचा उदार आश्रय विद्यापीठाला दीर्घकाळ मिळाला. दान मिळालेल्या शंभर खेड्यांच्या उत्पन्नातून अन् राजाश्रयातून विद्यापीठाचा खर्च चालायचा. इथले विद्यार्थी होतकरू होते आणि शिक्षक बुद्धिमान, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न होते. कौशल्यपूर्ण प्रशासन आणि राजाश्रया मुळे नालंदा विद्यापीठाची भरभराट होत गेली. आर्यदेव, शीलभद, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीतीर्, शांतरक्षित, कमलशील अशी विद्वानांची मालिकाच निर्माण झाली. न्यायशास्त्र ही नालंदा विद्यापीठाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी. जगभर अध्ययन आणि अध्यापनाची श्रेष्ठ परंपरा निर्माण करण्यात, नालंदाचा अर्थातच मोठा वाटा आहे. बाराव्या शतकापर्यंत ज्ञानदानाचा अखंड यज्ञ नालंदा विद्यापीठात सुरू होता.


नालंदाजवळ पावापुरीत भगवान महावीरांना केवलज्ञान प्राप्त झाले. जैन धर्माच्या या चोविसाव्या तीर्थंकराचे महानिर्वाणही पावापुरीतच झाले. महावीरांच्या निर्वाणानंतर ७५ वर्षांनी भगवान बुद्धाला नालंदा जवळच्या बोधगयेतच चैतन्याचा साक्षात्कार झाला. त्या शतकात भगवान महावीर आणि गौतम बुद्धाने नालंदा विद्यापीठाला अनेकदा भेट दिल्याचा इतिहास, पाली भाषेतल्या नोंदीत सापडला आहे. नालंदा विद्यापीठाच्या संस्कृतीवर जैन आणि बौद्ध संप्रदायांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव आहे, असे इथल्या खंडहरात वावरताना जागोजागी जाणवते. वस्तु संग्रहालयातही त्याचे अनेक मौल्यवान पुरावे आहेत. बाराव्या शतकात बौद्ध तत्वज्ञानाविरूद्ध पेटून उठलेल्या मोहम्मद बख्तियार खिलजी नामक आक्रमक युद्धखोराने, नालंदावर हिंसक हल्ला चढवला. विद्यापीठाला मिळणारा राजाश्रय ही तोपर्यंत संपुष्टात आला होता. बख्तियार खिलजीने विद्यापीठाचा विध्वंस केला. इथल्या ग्रंथालयाला आग लावली. या आगीत विद्यार्थी आणि अध्यापकांच्या सामुदायिक प्रयत्नातून निर्माण झालेली अलौकिक ज्ञानसंपदा, इथले ग्रंथ, सलग सहा महिने जळत होते. बुद्ध संप्रदायाचे अनेक प्रसारक आणि गुरू या हल्ल्यात ठार झाले अथवा परागंदा झाले.

ज्ञानाच्या शोधात हिमालय पार करून, पाहियान (इ.स. ४११)आणि ह्युएन त्संग (इ.स. ६११ ते ६४४) नालंदात आले. नालंदाच्या शिक्षण पद्धतीवर या चिनी तत्त्वज्ञांनी विपुल लेखन केले. कालांतराने ह्युएन त्संगच्या जीवनावर एक कादंबरी प्रसिद्ध झाली. ती तुफान गाजली, जगभर खपली अन् वाचली गेली. 'जनीर् टू द वेस्ट' या इंग्रजी ग्रंथाच्या अनेक आवृत्या निघाल्या. इतिहासकार म्हणतात, जागतिक ज्ञानपरंपरेत ब्रिटनच्या ऑक्सफर्ड, केंब्रिज अथवा अमेरिकेतल्या हार्वर्ड, स्टॅनफर्ड विद्यापीठांचे जसे स्थान आहे, त्याच दर्जाचे वैभव सलग आठ शतके नालंदा विद्यापीठाचे होते. ही परंपरा आणि वारसा भारताने टिकवला असता तर कदाचित देशाचा इतिहास बदलला असता.

डोंगराच्या पोटात दडलेल्या नालंदाचा ब्रिटीश व्हाईसराय कनिंगहॅम यांना १८६१ साली शोध लागला. या परिसराचे सलग दहा वर्ष १८७१ पर्यंत उत्खनन झाले. त्यात मोठी सभागृहे, बुद्धविहार, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मुदा, वसतिगृहे इत्यादींच्या स्वरूपात जणू खजिनाच सापडला. चीन, जपान, कोरिया, थायलंड, व्हिएतनामसह आशिया खंडाच्या अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भारतात डॉ. आंबेडकरांनी त्याचे पुनरूज्जीवन केले मात्र तोवर तो जवळपास लोपलेला होता. नालंदाचा ऐतिहासिक वारसा किती महान आहे, याची आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या बहुतांश नवबौद्धांना जाणीव नसावी, हे इथे लक्षात आले. 

बिहारमध्ये नेहेमीच या राज्याचे दोन चेहरे समोर येतात. राजकीयदृष्ट्या बिहार परिपक्व आणि जागरूक आहे, मात्र अलिकडे सामाजिक न्यायाचा झेंडा मिरवणाऱ्या नेत्यांनी झोटिंगशाही आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा उघड पुरस्कार केला. दांडगटांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली, इतकेच नव्हे तर त्यांच्या हाती सत्ताही सोपवली. या गैरव्यवहारामुळे राज्य बेशिस्त बनले. इतरांचे कायदेशीर हक्क हिरावण्याची वृत्ती वाढली आणि बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा विनाश ओढवला. मूळ बिहारची ओळख मात्र अशी नाही. इथल्या भूमीत प्रचंड ज्ञानलालसा आहे. स्वभावात धाडस आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रचंड कष्ट करायला बिहारी लोक घाबरत नाहीत. अनेकांच्या हाती कला आणि प्रखर बुद्धी आहे. आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षेत बिहारी विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी  सर्वाधिक असते. बेशिस्त वाटणाऱ्या भूमीत ज्ञानलालसेचा हा संस्कार नेमका कुठून आला? नालंदाच्या अवशेषांमधून तर हा प्रेरणास्त्रोत निरंतर वाहात नसावा?

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाच्या धतीर्वर 'इंडो एशियन इस्टिट्युट ऑफ लर्निंग चे स्वप्न पाहिले. नितीशकुमारांनी त्याला अनुसरून नालंदा विद्यापीठाचे सर्वार्थाने पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय तीन वर्षा पूर्वी  घेतला. जपान आणि सिंगापूरनेही यात सहभागी होण्याची इज्छा व्यक्त केलीय. विद्यापीठासाठी नोबेल पुरस्कार विजेते अर्मत्य सेन यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यरत आहे. नव्या विद्यापीठात विज्ञानाच्या विविध शाखा, इंजिनीअरिंग, वैद्यक, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्रे, भाषा, साहित्य आणि व्यवस्थापनाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा समितीचा मानस आहे. बौद्ध तत्त्वज्ञानासाठी स्वतंत्र विभागाखेरीज तत्त्वज्ञान, इतिहास आणि विविध धर्मांच्या तौलनिक अभ्यासाची अद्ययावत केंदे विद्यापीठात असतील. नालंदा विद्यापीठाच्या प्राचीन अवशेषांजवळच ५०० कोटी खर्चून ४५० एकरांवर हे विद्यापीठ उभे राहील. जवळच एक खास टाऊनशिपही होईल. संस्कारांच्या आदानप्रदानाचे नालंदा पुन्हा आंतरराष्ट्रीय केंद बनावे, यासाठी बिहार सरकार आणि अर्मत्य सेन यांची समिती मनापासून मेहनत करते आहे. अर्थात विद्यापीठाचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असल्याने संसदेला त्यासाठी खास कायदा मंजूर करावा लागेल. अर्मत्य सेन यांनी मध्यंतरी या प्रकल्पासाठी पंतप्रधान मनमोहन सिंगांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला तात्काळ संमती दिली. केंदात लवकरच नवे सरकार येईल. कायदेशीर सोपस्कार लवकर आटपले तर नालंदाचे पुनरूज्जीवन लवकर होईल, असे अर्मत्य सेन म्हणतात. अंधारलेल्या बिहारचे भवितव्य नालंदाच्या निमित्ताने उजळले तर साऱ्या देशालाही ते हवेच आहे!


आभार
प्रशांत म. गायकवाड


ड्रॅगन पॅलेस टेम्पल...अप्रतिम वास्तूकलेचा आनंद...!!!

लोकसत्ता , २६ एप्रिल २००९

धार्मिक आणि पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नागपूर शहराचे नाव कोरणारे कामठीतील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ विदर्भाच्या मुकुटातील लखलखता हिरा आहे.

‘हॉटस्पॉट’च्या संकल्पनेत चपखल बसणारी ही वास्तू अप्रतिम वास्तूकलेचा नमुना म्हणून विख्यात झाली आहे. नागपूर-जबलपूर मार्गावर नागपूरपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या ड्रॅगन टेम्पलची उभारणी दहा वर्षांपूर्वी करण्यात आली. २३ नोव्हेंबर १९९९ या दिवशी ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यटकांसाठी खुले झाले. भगवान गौतम बुद्धांच्या बौध्द धर्माला वाहिलेली शानदार वास्तू आता फक्त बौद्ध धर्मीयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सर्वच जाती-धर्माचे लोक या वास्तूची रचना अनुभवण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात.. आणि हेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या उभारणीचे यश आहे. ही सुंदर वास्तू पाहण्यासाठी गेल्या दहा वर्षांत विविध धर्माच्या ५० लाख पर्यटकांनी भेट दिलेली असून वार्षिक सरासरी ५ लाख पर्यटक येणारे विदर्भातील हे एकमेव स्थळ. ‘आर्किटेक्टरल मास्टरपीस’ याच शब्दात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे वर्णन करता येईल.
माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांचे १९९४ साली बीडी कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू असताना टोकियोतील मदर नारिको ओगावा सोसायटीच्या नारिका ओगावा यांची कामठीत योगायोगाने भेट झाल्यानंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारणीच्या प्रस्तावाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरुप आले. मात्र, या वास्तूला नेमके काय नाव द्यावे, यावर प्रचंड खल झाला. जवळजवळ दीडशे नावे नजरेखालून घातल्यानंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे नाव निश्चित करण्यात आले. २६ महिन्यांमध्ये ५ कोटी रुपये खर्चून ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. दहा एकर जमिनीवर उभारलेली ही वास्तू नागपूरचे प्रख्यात इंजिनियर दिवं. पी.टी. मसे आणि आर्किटेक्ट आर.एम. गोडसे यांनी संयुक्तपणे डिझाईन केली होती. बौद्ध परंपरेतील सवरेत्कृष्ट प्रार्थना मंदिराच्या संकल्पनेला डोळ्यापुढे ठेवून त्यांनी याचा कच्चा आराखडा तयार केला. लोटस टेम्पल म्हणूनही याची ओळख जगभर आहे. विस्तीर्ण परिसरातील हिरवळ, सुंदर पुष्पांनी बहरलेली झाडे, आणि आकर्षक लँडस्केपिंगमुळे ही वास्तू भुरळ घालते. फुलझाडांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली असून वास्तूरचनेच्या सौदर्यात त्यामुळे भर पडली आहे. देखणे कंपाऊंड आणि संगमरवरी पथ पाहून मन थक्क होते. संगमरवरी पायऱ्या चढून ध्यान केंद्रात शिरल्यावर गौतम बुद्धांचा चंदनाचा दहा फूट उंचीचा पुतळा लक्ष वेधून घेतो. हे ध्यान केंद्र बौद्ध धर्मीयांचे पवित्र पूजास्थळ आहे. या परिसरात सुंदर ऑडिटोरियम आणि ग्रंथालयही असल्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना भेट देण्यासाठी ही अत्यंत योग्य जागा आहे. ऑडिटोरियमचा एक सेक्शन बौद्ध धर्माच्या भूतकाळातील सोनेरी दिवसांच्या आठवणी ताज्या करतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘बेस्ट कॉक्रिंट स्ट्रक्चर’ हा पुरस्कार ड्रॅगन पॅलेस टेम्पलने पटकावलेला आहे. हा नागपूर शहराचा मोठा सन्मान आहे. पर्यटनाच्या व्याख्येत धर्म-जात-पातीला स्थान नाही. एक सुंदर वास्तूरचना पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी काही तास ड्रॅगन पॅलेस टेम्पलला देण्यास मुळीच हरकत नाही. तुम्ही सहकुटुंब वर्षभरात केव्हाही या हॉटस्पॉटला भेट देऊ शकता. जाण्याचा मार्ग अत्यंत सोपा आहे. स्वत:चे वाहन असेल तर ठीकच, जर नसेल तर शहर बसेससुद्धा कामठीपर्यंत रोज जातात. जागतिक शांतता, सौहार्द आणि मैत्रीचा संदेश देणारे ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यटकांना हाक देत आहे..!







आभार
प्रशांत म. गायकवाड

भगवान बुद्ध.... सावरकरांच्या टीकेवर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर....!

बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही...!!   संधर्भ  मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात दि २४ मे १९५६ रोजी डो बाबासाहेब यांनी केलेल भाषण    पुस्तक :- डो बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार , खंड ६ संपादक :- धनराज डाहाट   बुद्ध धरमावर बरेच लोक खोडसाळप...णे टीका करतात .त्यापैकी सावरकर एक होत .वास्तविक त्यांना म्हणायचे आहे हेच मला काळात नाही . बुद्ध हा वाइट मनुष्य आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ? बौद्ध धर्म प्रचारक राजे वाइट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी .मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे.केसरीत प्रसिध्द केलेल्या ‘बौद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरछेद ‘ या लेखातून त्यांनी स्प्श्पणे सांगितलं नाही सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे ,त्यांना उत्तर देण्याची माझी हिम्मत आहे..   भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्शुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राम्हण होते.हे सावरकरांना माहित आहे काय ? सारीपुत्त मोग्ग्लायान्सारखे पंडित ब्राम्हण होते , सावरकरांनी हे  विसरू नये सावरकरांना मला अस प्रशन विचारायचा आहे कि पेशवे कोण होते , ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले ?   तेव्हां अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये . काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकरांनी आपल्या पोटातील नरक ओकले !    तेव्हां  कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे मी बुद्द धर्म स्वीकारणार ! तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्य्चाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली . परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल , ती कधी परत जाणार नाही . या अफाट सागराला भरती येईल , पण ओहोटी येणार नाही . 


आभार
प्रशांत म. गायकवाड

एकवीरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार?

           लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची, तेथल्या त्या ओ-या, ते दिवाणखाने, ते स्तूप, सा-या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा. तेथें बाहेर एक देवी प्रगट झाली. तिचे नांव एकवीरा. हिला वेहेरची देवी असेहि म्हणतात. ही म्हणजे पांडवांची बहीण. हिच्यासाठीं भीमानें एका रात्रीत हीं लेणीं कोरून काढली. हिचा दुसरा इतिहास काय, तर ही रेणुका, परशुरामाची आई. स्वतः परशुरामच जेथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता तेथे त्याची ही एकवीरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार?

चैत्री पौर्णिमेची कार्ल्याची जत्रा मोठी दांडगी. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जाता. नवसापायीं शेळ्यामेंढ्यांचे कळपच्या कळप फडशा पाडून हीं कार्ला लेणी रक्तांत न्हाऊन निघतात. जो प्रकार कार्ला येथें, तोच प्रकार इतर सर्व लेण्यांत. जेथे असले बोकडखाऊ देवदेवींचे देऊळ नाहीं, तेथे प्लेझर पार्टीसाठी जाणारे लोक सुद्धां कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यांत अखंड सुरू असलेले हे `देवळी’ प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय?

सारांश, भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्धी विषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो, हे विसरता कामा नये.

पुस्तक देवांच्याही मागें बायकामुलांचीं लचांडें
लेखक :- प्रबोधनकार ठाकरे...!!!


प्रबोधनकार तुम्हाला माझा लाख लाख सलाम ....धन्यवाद..धन्यवाद...!



आभार
प्रशांत म. गायकवाड

जागतिक नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर....!!!!

आनंद म्हस्के


``छाती ठोकून सांगु जगाला।
 असा विद्वान होणार नाही।।
जर झाला विद्वावान मोठा।
 जसा बुद्ध भगवान होणार नाही।।''

गायक प्रभाकर पोखरीकरांचे हे गाणे! भावी पिढीला डॉ. बाबासाहेब व तथागत बुद्ध समजावून घेणे फार महत्त्वाचे आहेत. हे जगातील महान क्रांतीकारक जागतिक नेते आहेत. खरा लिडर तो असतो, जो आनंदाने जबाबदारी स्वीकारून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवतो. लिडरशीप हा कोणता दर्जा नाही. ती एक मानसिक जडणघडण आहे.

लिडरशिपसाठी जिद्द, स्वाभिमान , निर्भिडपणा, दूरदृष्टी हवी आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा पिंड हा समाजसुधारकाचा हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `रानडे गांधी ऍण्ड जिना' या ग्रंथात महान नेता कोणास म्हणावे यावर सुंदर विवेचन केलेले आहे. कार्लाईल या सुप्रसिद्ध विचारवंतांच्या मते थोर व्यक्तीकडे प्रामाणिकपणा हा उपजत असावा लागतो. तो स्वतची आत्मस्तुती करीत नाही. तसा त्याला अहंकारही नसतो. प्रामाणिकपणा शिवाय तो जगूच शकत नाही.

लॉर्ड रोझबेरी नेपोलियनच्या श्रेष्ठत्वाची चर्चा करताना म्हणतो, `नैतिक गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा समुच्चय म्हणजे थोर व्यक्ती होय. काही तत्त्वज्ञानी म्हणतात की, समाजातील साफसफाई करण्यासाठीच थोर व्यक्ती जन्मास येतात. त्यांच्यामध्ये सर्वसमान्य माणसांपेक्षा अलौकिक शक्ती असते. डॉ. बाबासाहेबांच्या मते यापैकी कोणतीही कसोटी पूर्णत्वाने बरोबर नसून अर्धसत्य आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात की, थोर व्यक्तीच्या अंगी प्रामाणिकपणा हवा; कारण ते नैतिक अधिष्ठान आहे. तसेच तो सत्याच्या जवळ न्यायमार्गाने जाणारा गुण आहे. परंतु नुसता प्रामाणिकपणा पुरेसा नाही. कारण व्यक्ती ही प्रामाणिक आहे पण मुर्ख आणि सुमार बुद्धीची असेल तर? बुद्धीच्या आधारे थोर व्यक्ती संकटातून मार्ग करू शकते. तरीही प्रामाणिकपणा व बुद्धिमत्ता ही व्याख्या डॉ. बाबासाहेबांना अपुरी वाटते. त्यासाठी (एमिनंट इंडिव्हिज्युअल) म्हणजेच थोर व्यक्ती ही समाजधारणेच्या हेतूने प्रेरित झाली पाहिजे. थोर व्यक्तीने सर्व प्रकारच्या मानवी अहिताच्या भावनांतून समाजाला स्वच्छ करुन असते.

तथागत बुद्ध, कबीर, महात्मा फुले आणि गाडगेबाबा यांनी समाजाची मने आणि भावना स्वच्छ करण्याचे कार्य केले म्हणून डॉ. बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरू आणि आदर्श मानले. जातीवर्ण व्यवस्थेच्या व अस्पृश्यांच्या प्रश्नावर संघर्ष करताना डॉ. बाबासाहेबांनी गांधी, टिळक, विठ्ठलराव शिंदे यांच्या थोरपणाचा बुरखा फाडून त्यांना ढोंगी म्हटले. कारण त्यांच्या आचार, विचार, उच्चार आणि कृतीमध्ये अस्पृश्यता निवारण्याचा प्रामाणिकपणा नव्हता. भारत हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळविणार! अशी घोषणा करणारे टिळक अस्पृश्य जातीत जन्मास आले असते तर भारत हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन करणे माझे आद्यकर्तव्य आहे, अशी टिळकांनी घोषणा केली असती.

अस्पृश्यांचे आपणच कैवारी असल्याचा गांधीजी गोलमेज परिषदमध्ये टाहो फोडीत होते. त्यांना डॉ. बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सुनावले,`` मि. गांधी आपण अस्पृश्यांचे दायी असाल पण मी त्यांची माई आहे.'' गांधी टिळक कितीही मोठे व लोकप्रिय नेते असले तरी डॉ. बाबासाहेबांनी त्यांचे पितळ उघडे पाडले. पुण्याचे गोखले स्मारक सभागृहात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांची सर्वोत्कृष्ट चिकित्सा करून त्यांच्या विचारांचे मोठेपण जगासमोर आणून रानडे यांना महान नेत्यांच्या पंगतीला बसविले. 

आधी राजकारण की आधी समाजकारण यामध्ये न्या. रानडे आधी समाजकारण म्हणत होते. परंतु टिळक, चिपळुणकर याला नुसता विरोधच करीत नव्हते तर न्या. रानडे यांच्या समाजसुधारणा कार्यात अडथळे निर्माण करीत होते. याच कसोटीवर डॉ. बाबासाहेबांनी न्या. रानडेंमध्ये महान  नेता शोधावा, ही मोठी बाब आहे. लोकक्षोभाची तमा न बाळगता डॉ. बाबासाहेब महात्मापेक्षा देश मोठा मानत होते. मी मूर्तीपुजक नसून मुर्तीभंजक आहे आणि टिळक, गांधी, जीना यांचे मूर्तीभजन मी एवढ्यासाठी करतो की, बॅ. गांधी व बॅ. जीना यांनी भारतीय राजकारणात फार गेंधळ करून ठेवला आहे. एक दिवस तर माझे देशबांधव समजतील की देशापेक्षा कोणी मोठा नाही. व्यक्तीपूजा नि देशप्रेम या भिन्न गोष्टी असून परस्परविरोधी सुद्धा असतील.

``खुद को कर बुलंद इतना,
 की हर तकदीरसे पहले
खुदा बंदे को पुछे,
बता तेरी रजा क्या है?''

याचा अर्थच असा आहे की, स्वतचा आत्मविश्वास तू इतका प्रबळ कर की तुझ्या भवितव्याचे प्रत्येक अक्षर हे तुझ्या इच्छेप्रमाणेच नियतीनं कोरलं पाहिजे. जर नियती व दैव नावाची गोष्ट असेल असं कुणाला वाटत असेल तरी माझा आत्मविश्वास आणि माझं कर्तृत्व हेच या देशामध्ये अंतिम ध्येय असलं पाहिजे. याचं मूर्तीमंत उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपल्या भाषणात जगातील महान विचारवंतांचे महान विचारवंतांचे महान विचार मांडणारे डॉ. बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला तलवारीसारखी धार असल्याने ज्यांना भीमटोला बसे त्यांना तो आंबेडकरी आवेश आणि झपाटा हा मूर्तीमंत तोफखाना वाटत असे.

इंग्लिश लेखक थॉम्पसन म्हणतो की,`डॉ. आंबेडकरांचे जे जे साहित्य दृष्टीस पडेल ते ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डॉ. आंबेडकरांमुळे सनातनी प्रवृत्तींना वेडाचे झटके येतात.' `बोले तैसा चाले तयाचि वंदावि पाऊले'.

डॉ. बाबासाहेबांनी उक्तीप्रमाणे कृती केली. माझ्या अस्पृश्य समाजाची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात अपयशी ठरलो तर स्वतला गोळी घालून घेईन, अशी प्रतिज्ञा केलेल्या डॉ. बाबासाहेबांनी शिवराय व शंभुराजे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या आंदोलनाची सुरूवात रायगड पायथा महाड येथे चवदार तळ्याचे आंदोलन करून पाण्याला आग लावली. त्या ज्वालामुखीतून 25 डिसेंबर, 1927 रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून विषमतेचा इतिहास मोडला. 13 ऑक्टोबर, 1935 रोजी येवला येथे धर्मात्तरांची घोषणा करून मानवतेच्या समतेचा इतिहास मांडला आणि 14 ऑक्टोबर, 1956 रोजी नागपूर येथे धर्मांतर करून मानवतेचा नवा इतिहास घडविला. 

1920 ते 1956 केवळ 26 वर्षांत स्वतचे आंबेडकरी युग निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब हे जागतिक नेते आहेत. महान अर्थतज्ञ असल्याचे `प्राब्लेम ऑफ दि रूपीज' हा ग्रंथ लिहून सिद्ध केले. समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, धर्मपंडित, घटनाशिल्पकार डॉ. बाबासाहेब हे केवळ अस्पृश्य, दलित बौद्धांचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे नेते आहेत. त्यांनी लिहिलेले संविधान, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही नितीमूल्य स्वीकारते पंरतु सनातन प्रवृत्तीला लोकशाहीच मान्य नसल्याने ते संविधान बदलण्याची भाषा करतात.

वाढती लोकसंख्या, पाण्याची बचत, पर्यावरण, देशाची अर्थव्यवस्था, सामुदायिक शेती एससी, एसटी, ओबीसी आरक्षण आणि हिंदू कोड बिल यावर विवेचन करून राष्ट्रविकासाला अनुकूल असल्याचे डॉ. बाबासाहेब जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. सत्ताधाऱयांनी  त्यावर विचार करून नियोजन केले असते तर लोकसंख्यांचे दुष्परिणाम, पाणीटंचाई, पर्यावरणाचा ढासळणारा समतोल, शेतकऱयांच्या आत्महत्या, महिलांचे 33 टक्के आरक्षण अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागले नसते. परंतु अस्पृश्यांचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या राष्ट्रहिताच्या निर्णयाला नेहमीच विरोध केला. त्याचे भारत आजही परिणाम भोगत आहे. डॉ. बाबासाहेब उच्चजातीत जन्मास आले असते तर याच सवर्णांनी त्यांची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढली असती.

डॉ. बाबासाहेबांनी परिवर्तन क्रांतीच्या चक्राला गतिमान केले हे ते थांबविणे कोणालाच शक्य नाही. त्याचे फलित  म्हणजे शिवराय, संभाजीवरील अन्यायाविरुद्ध मराठा सेवा संघ बोलू लागला. मराठा ओबीसी आरक्षण मागू लागला. स्वराज्यात महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले. ही सर्व डॉ. बाबासाहेबांच्या क्रांती संघर्षाची किमया आहे. डॉ. बाबासाहेब म्हणत, माझे नावं घेऊन जयजयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जी गोष्ट लाखमोलाची त्यासाठी सारे पाणपणाने झटा. प्रबुद्ध भारताची निर्मिती करणे हेच डॉ. बाबासाहेबांचे ध्येय होते. त्यासाठी आम्ही आपसांतील हेवेदावे, द्वेष, मत्सर सोडून जनहितासाठी बंधुभावातून सामाजिक व राष्ट्रीय एकोपा निर्माण केला पाहिजे.

त्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आघाडी घेऊन संविधान संस्कृती रूजविली आणि फुलविली पाहिजे.जगातील महान नेता डॉ. बाबासाहेबांचे आम्ही वारस आम्हाला ही परिवर्तन चळवळ यशस्वी करावी लागणार आहे. तरच आम्ही भिमाचे अनुयायी ठरु!


आभार
प्रशांत म. गायकवाड

'आंबेडकर' समजून घ्या!

डॉ. भालचंद्र मुणगेकर

आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे.

अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक; जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांची समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीयदृष्ट्या सखोल मीमांसा करून त्यांच्यामुळे केवळ अस्पृश्यांचेच नव्हे, तर सबंध भारतीय समाजाचे कसे अतोनात नुकसान झाले आहे, हे प्रभावीपणे सांगणारे एक दष्टे विचारवंत; 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहून बुद्धांच्या समग्र तत्त्वज्ञानावर भाष्य करणारा आणि त्या तत्त्वज्ञानाचा प्रचलित मानवी समाजाला अत्यावश्यक असलेला संदर्भ सांगणारा एक तत्त्वज्ञ; राजकीय अर्थशास्त्र आणि प्रशासनाचे नावाजलेले प्राध्यापक; विधी महाविद्यालयाचे प्राचार्य; मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे एक निष्णात बॅरिस्टर; कोकणातील अन्यायकारक खोती पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडणारे गरीब शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी.

१९४२ ते १९४६ या चार वर्षांत व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना या देशातील कामगारांचे सर्व प्रकारचे हित जोपासण्यासाठी कायदे करण्यात पुढाकार घेणारे निभीर्ड मजूरमंत्री. भारतातील स्त्रियांच्या समान अधिकारांची सनद असलेल्या हिंदू कोड बिलाचे निर्माते आणि सरकारमध्ये ते मान्य होत नाही, असे दिसताच स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्रीपदाचे राजीनामा देणारे 'स्वाभिमानी' केंदीय मंत्री! (अर्थात हिंदू कोड बिल हे राजीनाम्याचे एक प्रमुख कारण होते.) हे वर्णन आणखीही वाढविता येईल.

डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू मी थोड्याशा विस्ताराने इथे अशासाठी सांगितले की भारतातील एकही समाजघटक त्यांच्या ऋणातून मुक्त नाही. तरीही देशभर आणि सबंध जगात पसरलेले त्यांचे अनुयायी सोडले, तर एकूण भारतीय समाजाने त्यांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची दखल घेतलेली दिसत नाही. अस्पृश्यांचे, फार तर दलितांचे पुढारी, आणि वस्तुस्थिती नाकारता येत नाही म्हणून 'भारतीय घटनेचे शिल्पकार' इथपर्यंतच त्यांची ओळख आहे. अनेकांना तर राखीव जागांच्या धोरणांचा आग्रह धरून त्यांनी गुणवत्तेची आणि कार्यक्षमतेची वाट लावली, असेच वाटते.

शेकडो वर्षांच्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या संकुचित आणि खंडित मनोवृत्तीचेच हे निदर्शक आहे. खरे पाहता, डॉ. आंबेडकर यांनी या देशाच्या जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचा अगदी मुळाशी जाऊन विचार केलेला आहे. इतकेच नव्हे, तर अशा प्रश्नांची सोडवणूक कशी करावी, यासबंधी वेळोवेळी उपाययोजनाही सांगितली आहे. आर्थिक धोरण, संसदीय लोकशाही, परराष्ट्रीय आणि संरक्षणधोरण, भाषावार प्रांतरचना, शिक्षणप्रणाली व विद्यापीठांची पुनर्रचना, पाणी-धरणे-वीजविषयक धोरण, नद्यांच्या पाणीवाटपावरून शेजारच्या राज्यातील तंटे... देशाचा अगदी एकही प्रश्न त्यांच्या नजरेतून सुटला नाही.

काळाच्या ओघात या उपाययोजनेचा पुनविर्चार वा तिची पुर्नमांडणी होणे शक्य आहे. उदा. त्यांनी जमिनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा कार्यक्रम सांगितला. समाजवादी क्रांती झाल्यानंतर ज्या ज्या देशांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण केले, तिथे तो प्रयोग यशस्वी झाला नाही. मात्र, हे जरी खरे असले, तरी भारतामध्ये केवळ २०-२५ टक्के मोठ्या व मध्यम शेतकऱ्यांच्या हातात ७० टक्क्यांहून अधिक शेतजमीन असल्यामुळे मुबलक अन्नधान्य पिकवूनही देशातील किमान एक-चतुर्थांश लोक दारिद्यरेषेखाली राहतात, ही गोष्ट आपल्याला नजरेआड करता येत नाही.

देशाच्या प्रश्नांचा इतका समग्र, विस्तृत आणि सखोल विचार त्यांनी का केला असेल? आणि तोही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांना सतत अवहेलना सहन करावी लागली तरीही? याचे एकच उत्तर आहे. डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते. त्यांची राष्ट्रनिष्ठा शंभर नंबरी सोन्यासारखी होती. दोन-अडीच हजार वर्षांच्या जातिव्यवस्थेविरुद्ध अगदी एकाकीपणे संघर्ष करणे, ही भारतीय इतिहासाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी होती. खरे म्हणजे, ती यशस्वीपणे निभावून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सामाजिक आशय देण्याचे ऐतिहासिक कार्यच त्यांच्या हातून घडले आहे.

हा आशय प्रत्यक्ष देण्याची संधी जेव्हा त्यांना घटनासमितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदामुळे मिळाली, तेव्हाही त्यांनी त्या संधीचे सोने केले. पर्वत, नद्या, डोंगर, फुले आणि फळे ही राष्ट्राच्या अस्मितेची प्रतिके आहेत, हे खरे. परंतु मुळात राष्ट्र ही संकल्पनाच माणसाने निर्माण केली. म्हणून राष्ट्राचा खरा नायक माणूस आणि राष्ट्र म्हणजे माणसा-माणसांतील संबंध. हे संबंध समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेले असावेत, हा डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता. आज भारतात (आणि जगात इतरत्रही) खऱ्या अर्थाने तसे ते नाहीत, ही त्यांची खंत होती. ते तसे का नाहीत आणि ते कसे निर्माण करता येतील, हे कळण्यासाठी या देशाने आंबेडकर समजून घेणे आवश्यक आहे.


आभार
प्रशांत म. गायकवाड

विश्व परिवर्तनाचा क्रांतीकारी ...!!!

विचार-

डॉ.बाबुराव गुरव

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्त्व, विचार आणि कार्य हे एकविसाव्या शतकातील वैश्विक समाजक्रांतीच्या अभ्यासकांचे, व पाईकांचे, चिंतनाचे आणि अनुसरणाचे प्रमुख दर्शन आहे. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्याचा नेमका आवाका कोणाही सच्च्या आंबेडकरवाद्याला अजूनही आलेला नाही. ही समाजपरिवर्तनाच्या चळवळीची खरी शोकांतिका आहे.
या शतकातील जगासमोर किंग मार्टीन ल्यूथर, जॉर्ज डब्ल्यू कर्व्हर, मार्क्स, लेनिन, माओ, थॉमस पेन, म.ज्योतिराव फुले, म.गांधी हे महामानव समाज शिल्पज्ञ(Social Arcitect) म्हणून उभे राहणार आहेत.

या सर्वांच्या मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विशिष्ट जात, वर्ग, वर्ण आणि विचार स्थानामुळे अग्रभागी असणार आहेत.  
बाबासाहेबांचा जन्म एकोणिसाव्या शतकातला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकूण विकास आणि प्रकाश विसाव्या शतकातला आहे. महामानवाला फारसे व्यक्तीगत जीवन नसते. किंवा असे म्हणता येईल की, त्यांचे व्यक्तीगत खाजगी जीवनसुध्दा त्यांच्या प्रकट सामाजिक जीवनाचेच एक अविभाज्य अंग असते. बाबासाहेबांचे अध्ययन, संशोधन आणि पदवीधारणाचे काम चालू असतानाच त्यांच्यातला दृष्टा महापुरुष आकार घेत असणार. आपली भावी दिशा आखत असणार.

बाबासाहेबांची सामाजिक भूमिका स्वीकारण्याची सुरुवात साधारणपणे 1916 साली झाली असे आपण मानले तर सुमारे चाळीस वर्षे एक जिवंत भौतिक वैज्ञानिक विचारयंत्र जागतिक समाजरचनेच्या फेरमांडणीचा जिवंत प्रयोग बाबासाहेबांच्या रुपाने करत होते, हे आपण समजून घेतले पाहिजे.  
जगातला कुठलाही महापुरुष शून्यात, चमत्काराने अवतरत नसतो. कोणी काहीही म्हटले तरी तो ईश्वराचा पुत्र, प्रेषित, पूर्वी होऊन गेलेल्या महापुरुषाचा नवा अवतार अगर ईश्वरी अवतार मुळीच नसतो.
  
तत्कालीन समाजवास्तवाचा वेध घेत विसंगती, विषमता, शोषण आणि अन्यायाच्या विरोधी मूलगामी संघर्ष उभे करणारे ते एक गतीमान सातत्यशील लोकनेतृत्व असते. जनप्रबोधनाच्या लाटेमागून लाटा उभा करणारे, समाजजीवन व्यवहारात वेगवेगळया चळवळी उभ्या करुन आचार आणि विचाराच्या नव्या संहिता पेरुन समाजाची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि क्रांतीकारीता विकसित करणारे ते एका समाजशास्त्रज्ञाचे घडणारे आणि घडविणारे प्रेरणारुप असते. भूतकाळातील अपयशी पण क्रांतीकारी प्रयोगांचे तपशील, तत्त्वज्ञान आणि व्यवहार अभ्यासत भविष्यकाळातील सहकाऱ्यांच्यासाठी कार्यशैलीचा वस्तुपाठ उभा करत नवजीवन दर्शन उभे करणारे ते इतिहासाचे एक अपरिहार्य पान असते.  

बाबासाहेबांनी अभ्यास, निरीक्षण आणि चिंतन बालपणीच सुरु केले. ज्ञान आणि शहाणपण एकाच वेळी घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या बालपणी समाजसेवेचे दलितवर्ग सुधारणेचे, दानाचे, उपकाराचे असंख्य प्रयोग सुरु होतेच. बाबासाहेबांचे वेगळेपण मूलगामिता, क्रांतीकारीता आणि पर्यायी समाजरचनेच्या शक्यतांचा वेध घेण्यात आहे. त्यांनी गडबडीने कोणाचा गंडा दोरा बांधला नाही. घाईगर्दीने व्यवस्थेचा एक भाग होणे टाळले. व्यवस्था परिवर्तनासाठीचा अभ्यास आणि प्रयोग आरंभला. तर्कसंगतता, विवेकशिलता, विज्ञाननिष्ठा व्यापकता, सखोलता आणि व्यवहार्यता ही बाबासाहेबांच्या कार्यशैलीची वैशिष्टये आहेत. त्यांनी प्राचीन भारतीय भौतिक संघर्षाचा आणि अवैदिक परंपरेचा वेध घेतला.

त्या प्रवासात त्यांना गौतम बुध्द, महावीर, चार्वाक, निस्मार, दिग्नाग, अश्वघोष, धम्मकिर्ती, चक्रधर, बसवेश्वर भेटले. भक्तीसंप्रदायातले कबीर, तुकाराम, चोखोबा अठरा पगड जातीचे संत भेटले. म.फुले, शाहू राजे त्यांच्या समोर होतेच. मार्क्स, एंगल्स, केन्झ, थॉमस पेन, रुसो, वाल्टेअर, व्हिटमन, सॉक्रेटिस प्लेटो, ऍरिस्टॉटल या साऱ्यांचे विचारदर्शन बाबासाहेबांनी जवळून घेतले होते.
इंग्लंड, अमेरिकेतील विद्यापीठांची ग्रंथालये बाबासाहेबांनी आपली साधनागृहे बनविली. तत्कालीन अनेक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याबरोबर चर्चा केल्या. बुध्द, कबीर आणि फुले या गुरुत्रयींनी बाबासाहेबांना जीवनमूल्ये पुरविली. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला. जीवनातील अस्पृश्यता आणि दारिद्य्राच्या वास्तवाने त्यांना अनुभवाचे कारुण्य मूल्य बहाल केले.  
    
प्रज्ञा, करुणा आणि शील. शिका व संघटीत व्हा आणि संघर्ष करा. राजकारणाच्या गाडीचे चालक व्हा! आपल्या घराच्या भिंतीवर जावून लिहा आम्ही राज्यकर्ती जमात होणार आहोत! ही  आणि अशा आशयाची आवाहने करुन बाबासाहेबांनी आपली विचार दिशा मांडली. बाबासाहेब लोकशाहीवादी, जातीअंताचा लढा उभारणारे शुद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या हक्काचे रक्षणकर्ते ठरले. शाहूराजांनी सुरु केलेल्या राखीव जागांच्या धोरणाला बाबासाहेबांनी उत्क्रांतरुप दिले. भारताची राज्यघटना लिहून भारतीय समाजाच्या भावी वाटचालीची दिशा त्यांनी आखून दिली.

धर्मांतराच्या कृतीने त्यांनी हिंदू अस्पृश्यांना गौतम बुध्दांच्या अनित्यतावादाच्या क्रांतीकारी वाटेवर उभे केले.
रिपब्लिकन पक्षाची स्थापना करुन एक लोकशाहीवादी राजकीय महामार्ग त्यांनी तयार केला. आपल्या दर्जेदार, विपूल, वैचारिक साहित्य लेखनातून जात, वर्ण, वर्ग, लिंगवादी विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजव्यवस्थेत बदल घडविण्याची आयुधे बाबासाहेबांनी भारतीय  जनसमूहांना बहाल केली.     
बाबासाहेबांना आपला जीवन प्रवास करत असताना अनेक कटू गोड अनुभव आले होते. पुरोगाम्यांच्या मर्यादा. प्रतिगाम्यांचे कडवेपण. विद्वानांचा एकांगीपणा. गरीब पण सवर्ण जनतेची गतानुगतीकता. कष्टकऱ्यांच्या राजकारणाचे फूटीरपण. सर्वदूर पसरलेला वर्गजाणीवेचा अभाव. व्यापक-सर्वंकषतेचा आत्मविश्वास न गवसलेले पक्ष आणि पुढारी. जात वर्ण वर्ग वंशांच्या किमान पाच-सहाशे लहान मोठया गटागटात विखुरलेला समाज. स्वजातीच्या खोटया मोठेपणाविषयीचा अहंकार आणि परजाती विषयी द्वेष पोसण्याची मानसिकता. मागास उत्पादन पध्दती. सरंजामी जमीनदार आणि नव्याने विकसीत होऊ घातलेल्या भांडवलदारांचा समाजातला वरचष्मा. संवेदनाहीन क्रूर बनलेली शोषणयंत्रणा. स्वत:च्या शोषणाबद्दल, शोषकाबद्दल फारसे ज्ञान, व संताप नसलेले थंड पडलेले जनसमूह. अज्ञान, दारिद्य्र, विषमता, अंधश्रध्दा, अनारोग्य आणि व्यसन अशा दोषांनी ग्रस्त समाज. या आणि अशा भारतीय जनसमूहांच्या वास्तव प्रश्नांचे भान असणारे फार थोडे नेते तत्कालीन भारतीय समाजात उपलब्ध होते. काहींचा अभ्यास चांगला होता पण ते कृतिसंदर्भात संकुचित होते. व्यापक चिंतन आणि संवेदनशीलतेचा अभाव हे भारतीय नेतृत्वाचे खास चरित्र आहे. दीर्घकाळ जाती बंद रचनेचे खोलवर रुजलेले दुष्परिणाम नवा माणूस नवे आधुनिक नेतृत्व तयार करण्यात अडसर बनत  होते. म.गांधींच्या सारखे आश्वासक सर्वस्पर्शी नेतृत्व उच्चवर्ण वर्गांच्या, अभिजन वर्गाच्या हृदय परिवर्तनावर, दलित कष्टकरी आणि स्त्रियांच्या अभ्युदयाचा रंजक आशावाद पेरत होते.
प्रबोधनाच्या पातळीवरची व्यापक, प्रतिनिधीक आंदोलने करुन समाज समन्वयाच्या पध्दतीने आधुनिक लोकशाही समाजनिर्मितीचे स्वप्न म.गांधी पहात होते. या पार्श्वभूमीवर लोकशाहीवादी पण प्रखर जनआंदोलनांच्या आधारे सामाजिक, आर्थिक न्यायावर आधारीत नवा विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीचे स्वप्न डॉ.आंबेडकरांनी पाहिले. रचना प्रबोधन आणि संघर्षाच्या पायावर तळातील जातवर्गातून उत्क्रांत होऊ घातलेला एक नवा राजकीय प्रवाह डॉ.आंबेडकरांनी जन्माला घातला. त्यांनी पुढच्या शंभर वर्षातील समाजाच्या बदलाचे चित्र पाहिले. तोच विषय आपल्या चिंतनाचा, संवेदनशीलतेचा विषय बनविला. आपले सारे लेखन त्यांनी त्या दिशेने आशयघन बनविले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या प्रकारचे समजशक्तीने समृध्द बनलेले एकटे आणि एकमेव प्रभावी जनमान्य नेते होते.  

आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय उपखंडाबरोबर सारे विश्व हालले, हादरले. बाबासाहेबांचे हे असे आपल्या कार्यकर्तृत्वांच्या शिखरावर असताना कालवश होणे सर्वांना धक्का देऊन गेले होते. अजून किमान दहा वीस वर्षे बाबासाहेब आपले विश्व समाज निर्मितीचे गतीमान काम करत राहतील असे अनेकांना वाटत होते. बाबासाहेबांच्या नंतरची त्यांच्या अनुयायांची पाचसहा वर्षे स्वत:ला सावरण्यात गेली. त्यानंतर हे सर्व अनुयायी गटागटात विभागलेले जनतेने पाहिले. नेतृत्वाच्या व्यक्तीवादी अतिरेकाने चळवळ फुटत गेली. भारतातली भांडवली लोकशाही आपल्या गतीने विकास पावत होती. देशी विदेशी भांडवलदार लढणाऱ्या जनसमूहांना प्रभावहीन बनविण्याचे नवे नवे मार्ग शोधत आहेत. सरंजामदार, जमिनदार आणि धर्मांध जातीयवादी मनापासून भांडवलदाराशी एक रुप होत आहेत. दलित, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, छोटे कष्टकरी शेतकरी, कारागीर, बलुतेदार, आलुतेदार, आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती, स्त्रीया हे आंबेडकरी लोकशाहीच्या विकासाचे मूळ घटक दिवसेंदिवस फूटकळ बनत आहेत. परस्परविरोधी दावे करत आहेत. आंतरविरोध, विसंगती, अविश्वास आणि अहंकाराने परिणामशून्य बनत आहेत. आंबेडकरी प्रवाहाचे अग्रदल ''नवबौध्द'' बहुजन समाजाला आपल्या पंखाखाली घेऊ शकणारे व्यापक नेतृत्व देण्यात आजतरी यशस्वी झालेले नाहीत. तसे प्रयत्नही दिसत नाहीत. उत्तर भारतामध्ये सत्तरच्या दशकापासून कांशीराम यांनी समाजशास्त्रीय दृष्टया शास्त्रशुध्दपणे बहुजन समाजाची चळवळ बांधली. बामसेफ डी.एस.फोर आणि पुढे बहुजन समाज पक्षाच्या रुपाने एक राजकीय प्रवाह उभा केला. चौदा खासदार आणि सत्तर आमदार निवडून आणण्यात त्यांनी यश मिळविले. फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे आणि तत्त्वज्ञान मांडण्यात त्यांनी यश मिळविले पण एका राजकीय संकटातून बाहेर येण्यासाठी आणि सत्तेच्या मोहातून त्यांनी भाजपबरोबर युती करुन आपल्या विकासाच्या शक्यता आपल्याच हातांनी धुळीला मिळविल्या. डॉ.आंबेडकरांच्या नंतरचा संसदीय राजकारणात सर्वात जास्त यशस्वी झालेला हा आंबेडकरवादी नेता पथभ्रष्ट झाला. बहुजनांच्या चळवळीतला कोलंबस वाट चुकला.     
सत्तेच्या माध्यमातून समाजपरिवर्तन हे यशवंतराव चव्हाणांचे आवडते राजसूत्र कांशीरामनी अनुसरले. तुफान प्रचारच्या क्षमता लाभलेल्या मायावतींनी ते पुढे नेले. बहुजन जातींचे संघटन जातीअंतासाठी, बहुजन समाजनिर्मितीसाठी करायचे हे सूत्र व्यवहारात मागे पडले. बहुजन समाजपक्षाने आपले  नेमके आर्थिक धोरण आजवर ठरविले नाही. पहिला निवडणूक जाहीरनामा पक्ष स्थापने नंतर वीस वर्षांनी जाहीर केला. मतांचे आडाखे, जागांचे गणित अडवणूक क्षमतेचा अधिक लाभासाठी वापर मूल्यशून्य आघाडया यामुळे पक्षाची विश्वासार्हता क्रमश: घसरत चालली आहे. गुजराथमध्ये नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यापर्यंत मायावतींची मजल जावी, याचा खऱ्या आंबेडकरवाद्यांना खेद वाटणार नाही काय? शाहू विद्यापीठ नवे जिल्हे, आंबेडकर उद्यान असे करत करत मायावती ताज कॅरीडॉर पर्यंत पोहोचल्या. आता आर्थिक गुन्हेगार म्हणून त्यांना तुरुंगाच्या कॅरीडॉर मध्ये पाठवायला भाजप उत्सुक आहे.      महाराष्टातला रिपब्लिकन पक्ष धर्मांध जातीयवाद्यांपासून आजपर्यंत तरी सावध आहे. या ना त्या भांडवली पक्षाचा दुय्यम सहकारी बनल्यावाचून या पक्षाचे पाऊल पुढे पडत नाही. निवडणूका लढवायला पैसा लागतो. दलित जनता आणि नेत्यांच्याकडे तेवढा पैसा नाही. पण नवे पर्याय शोधणार का नाही? एकसंघ पक्ष उभारणार का नाही? नवबौध्दाशिवाय उर्वरीत दलित जाती, जमाती, आदिवासी, फिरत्या जमाती, आलुतेदार, बुलतेदार, कारागीर, कष्टकरी जनसमूहांमध्ये विश्वासार्हता तयार करुन पक्षाचा पाया विस्तारीत करणार की नाही? कधी कसे करणार? असे अनेक प्रश्न आज उभे आहेत.   

दुसऱ्या बाजूला या जगातली एक महत्वाची विचारधारा म्हणून आंबेडकरवाद विकसीत होतो आहे. देशात आणि परदेशात सर्वदूर आंबेडकरांच्या वैचारिक मांडणीचा सखोल अभ्यास होतो आहे. भारतीय उपखंडातील सर्व देशातली दलित कष्टकरी तळातली जनता आंबेडकरवादी, प्रभावी, प्रवाही आणि आश्वासक नेतृत्वाच्या शोधात आहे. जनतेचे प्रश्न, शोषण वाढलेले आहे. धर्मांध जातीयवादी आणि भांडवलदार एकजीवाने जनतेला मिळत आहेत. दहशत वाढवत आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, व्यापारीकरण, यांत्रिकीकरण अशा धोरणांनी जनता हैराण झालेली आहे. सांस्कृतिक साम्राज्यवादाने परिसीमा गाठली आहे. रेडीओ, टी.व्ही., वर्तमानपत्रे जाहिराती आणि भांडवली प्रचारात दंग आहेत. गरीब कष्टकरी दलित निर्णायकी बनते आहे. एक पर्याय म्हणून आंबेडकरांच्या विचाराकडे आकर्षित होते आहे. डॉ.आंबेडकरांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाच्या आगे मागे सारा भारतवर्ष आंबेडकरमय झालेला असतो. नागपूर, मुंबईपासून पाच दहा घरांची बकाल खेडी कोटयवधी भूकेकंगालांच्या अस्मितादर्शनाने ''नीलसागर'' बनत आहेत. जगातली वीस टक्के जनता आंबेडकरांना कमी जास्त प्रमाणात ओळखते, मानते. जगातल्या दीडशे देशात आंबेडकरी दर्शनांचा अभ्यास या ना त्या कारणासाठी सुरु आहे.     

या अवस्थेत खऱ्या आंबेडकरी नेतृत्त्वाने आत्मविश्वासाने आक्रमकपणे राजकीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात आश्वासक हस्तक्षेप केला पाहिजे. व्यापकता, सखोलता, शास्त्रशुध्दता, क्रांतीकारकता आणि तडजोड शून्यता स्वीकारुन जननायकत्व खेचून घेतले पाहिजे. भोगवादी भांडवली संस्कृतीला पर्यायी दलित कष्टकरांची विचार आणि कृतिनिष्ठ राजकीय संस्कृती उभी केली पाहिजे. नवा चारित्र्यसंपन्न राजनायक  जनतेत उभा केला पाहिजे. नवी साधने, नव्या प्रचार पध्दती अवलंबल्या पाहिजेत. पायी, सायकल, मोटर सायकल. फार तर एखाद दुसरी जीप एवढया तटपुंज्या साधनावर परिसर ढवळून काढला पाहिजे. हातावर चटणी भाकर खाणे. ओढया नाल्यावर कपडे धुणे, गरीबाच्या झोपडीसमोर एअर कंडिशन वातावरणात विश्रांती घेणे अंगिकारले पाहिजे. असे केले तर वीस वर्षात खरा आंबेडकरी नायक देशाच्या प्रमुख पदी पोहोचेल. कष्टकऱ्यांची लोकशाही क्रांती सफल होईल. गरज आहे विचारनिष्ठेची. श्रमिक, दलित निष्ठेची. समाजक्रांतीच्या तळमळीची. दृष्टिकोनाची आत्मविश्वापूर्वक राबण्याची.

 
 
आभार
प्रशांत म. गायकवाड

आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता....:- आचार्य अत्रे

- आचार्य अत्रे

 बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.

आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली 'भीमा'ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय.

महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते.

जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच 'लोकसभे' त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, 'हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.' हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृति'मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते.

यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.

धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ''हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !'' हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता.

अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे 'करारा' वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. 

आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,''स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!'' नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, 'जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!' आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि 'स्वातंत्र भारता'ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. 'मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!' घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही.

आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही. 

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता.

शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौध्द करीन!' अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता. भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.'मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!' ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते.

आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते. 

महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वता त्यांचा त्याग, चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनांत निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहीलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. तीन कोटि मराठी जनतेच्या वतीनं व्याकूळ हृदयाने आणि अश्रपूर्ण नेत्रानीं आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो- आचार्य अत्रे 

आभार
प्रशांत म. गायकवाड

दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी? पु.ल.

चंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश...

आयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ' मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ' या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.

ऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ' धम्म ' . ' धम्म ' या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ' धम्म ' असं आहे.

बाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.

दलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.

दलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.

http://lekhsangrah.wordpress.com/


आभार
प्रशांत म. गायकवाड