Sunday 22 May 2011

अस्पृश्य जनांचे संघ छळवाद होऊन बहिष्कृत पडलेल्या बौद्धजनांचेच अवशिष्ठ भाग आहेत....! प्रबोधनकार ठाकरे.

प्रबोधनकार ठाकरे 
पुस्तक हिंदुजनांचा –हास आणि अधःपात 
भाग १६

इ.स.७५०त दक्षिण हिंदुस्थानात कुमारील भट्ट नामक ब्राह्मण धर्ममार्तंडाने बौद्धांचा नायनाट करण्याचा पायंडा घालून ठेवलेला होताच. इ.स.८३०मध्ये श्रीशंकराचार्यांनी त्याच पायंड्यावर पाऊल ठेवून, रजपूत राजांची मने बौद्धांविरुद्ध खवळून सोडण्याची कामगिरी हाती घेताच, काश्मीर, नेपाळ, पंजाब, रजपुताना आणि गंगा-यमुना नद्यांमधल्या बिहारादी उत्तर-पश्चिम व मध्य हिंदुस्थानच्या सर्व प्रदेशांतून सर्रास बौद्धजनांच्या छळांचा आणि ससेहोलपटीचा भयंक्र उपक्रम, रजपूत राजांनी आणि त्यांच्या ब्राह्मणी – हिंदू सहाय्यकांनी सुरू केला.
बिचा-या बौद्धांची स्थिती, या वेळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी होती. त्यांची खेडी उद्ध्वस्त करण्यात आली. घरेदारे जाळली लुटली गेली. बायकांची अब्रू घेण्यात आली. पुरुष आणि मुलांना कोठे हद्दपार केले, तर कोठे त्यांची सर्रास कत्तल करण्यात आली. अशा या हलकल्लोळातून जे बौद्धजन कसे तरी लपूनछपून वाचले, त्यांना समाज व व्यवहार-बहिष्कृत करून, लोकवस्तीपासून पार दूर पिटाळून लावले. अर्थात त्याना कमालीतली कमाल नीच अवस्था प्राप्त झाली. उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्यांना साध्या माणुसकीला साजेशोभेशा सामान्य शिष्ठतेचीही बंदी करण्यात आली.

आज आमच्या डोळ्यांपुढे वावरणारे हारी, डोम, मच्छी, चांभार, केवरा, बागडी, नामशूद्र, महार, धेड, मांग इत्यादी अस्पृश्य जनांचे संघ या छळवाद होऊन बहिष्कृत पडलेल्या बौद्धजनांचेच अवशिष्ठ भाग आहेत.

 
आभार
प्रशांत म. गायकवाड

No comments: