Monday 16 May 2011

इतिहासाची मांडणी पुन्हा व्हावी शिवाजी महाराजांची इच्छा

भुतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहीती म्हणजे इतिहास होय, अशी इतिहासाची व्याख्या केली जाते. त्यामुळे भूतकाळात जे घडले ते निपक्षपातीपणे सांगणे हा इतिहासाचा हेतू होय. परंतू आजपर्यंत बहुजनाना इतिहासाच्या नावाखाली त्यांच्याच पराभवाच्या, बदनामीच्या गोष्टी तिखट-मिठ लावून सांगीतल्या गेल्या. स्वाताच्या पूर्वजांचा इतिहास समजून घेण्यासाठी बहुजन समाज ब्राम्हनावर अवलंबुन राहीला हे बहुजन समाजाचे दुर्दैव होय.
              समाजातील उच्च स्थानी असलेला ब्राम्हण वर्ग आजपर्यंत इतिहासाची मांडणी करत आला आहे. परिणामी ती मांडणी करताना त्यानी स्वताला पोषक अशीच केली आहे. बहुजनांच्या महापुरुषाना खलनायक ठरवून त्यांच्याच वंशजांच्या मनात या महापुरुषाविषयी किल्मिष निर्माण करण्याचे महापातक ब्राम्हणी इतिहासाने केले. त्याचप्रमाणे ज्या महापुरुषांचे बहुजन समाजात अत्यंत आदराचे स्थान आहे आणि कुठल्याही परिस्थितीत बहुजन समाज ते स्थान नाकारायला तयार नाही, असे दिसताच ब्राम्हनानी आपले डावपेच बदलले. या महापुरुषांचे ब्राम्हनीकरण करून त्यांचे विचार व कार्य ब्राम्ह्णी संस्कृतीला पोषक होते आणि ते ब्राम्हणी धर्माचे समर्थक, रक्षक होते अशी मान्डणी आज वर केली गेली. हजारो वर्षापासून बहुजन समाजातील अनेकानी विरोध केला. ब्राम्ह्णी संस्कृतीविरूद्ध क्रांती केली. परंतु इतिहासाची प्रभावी अशी पुनर्मांडणी करण्यात बहुजन समाज कमी पडला, अयशस्वी ठरला. त्यामुळे प्रत्येक वेळी ब्राम्ह्णी संस्कृतीने बहुजनाच्या क्रांतीविरूद्ध प्रतिक्रांती केली. खोट्या इतिहासाला निष्प्रभ करण्यासाठी त्याला विरोध करणे हा एक मार्ग मानला तरी तो पुरेसा नाही. भावी पिढ्याना ब्राम्हणी इतिहासाचा हा खोटेपणा कळण्यासाठी ‘प्रतिइतिहास ’ निर्माण करण्याची गरज आहे. दुर्दैवाने या आधीच्या काळात असे प्रयत्न अपवादानेच झाले असे म्हणावे लागेल. त्यामुळे त्या काळापुरती बहुजनाची सरशी झाली व ब्राम्ह्णी इतिहास खोटा पडला तरी पुढील काळात तोच खरा इतिहास म्हणून बहुजन समाजाच्या माथी मारला जातो.
              समाजाच्या विविध क्षेत्रात घडणार्या विविध घटनाची नोंद करताना अत्यंत एकतर्फी, एकांगी व पक्षपाती पद्धत अवलंबणे, हे वैदिक संस्कृतीचे एक ठळक लक्षण होय.स्वाताचा इतिहास जाणुन घेण्यासाठी आपल्याच शत्रूवर अवलंबून राहणे ही आपली फार मोठी चूक झाली. बहुजन समाज इतिहासाच्या साधनाबद्दल , इतिहास लेखनाबद्दल अनभिज्ञ राहीला, त्यामूळे आपल्या सांस्कृतिक शत्रूनी सांगितलेला, लिहिलेला एकांगी, पूर्वग्रहदुषित इतिहास आपण स्वीकारला. त्यामुळे बहुजनांच्या शेकडो पिढ्यांचे वैचारीक, सामाजिक नुकसान झाले.
              इथून पुढील काळात आपल्या पूर्वजांची ही चूक आपण सुधारण्याची गरज आहे. त्याची सुरूवात तर झाली आहे. नुसत्या सुरुवातीने ब्राम्हणी संस्कृतीचे बुरूज ढासळतील की काय अशी शंका यायला लागली आहे. इतिहासाच्या पुनर्मांडणीचे हे कार्य बहुजन समाजातील सुशिक्षीत, सुजाण लोकानी पुढे चालू ठेवले पाहिजे. वाचकांच्या पत्रव्यवहारपासून संपादकीयापर्यंत आणि पुस्तके, कथा, कादंबर्या, चित्रपट, नाटके, मालिका, इंटरनेट या माध्यमाद्वारे बहुजन समाजाचा प्रगल्भ आणि प्रभावी इतिहास आपण मांडला पाहिजे. आपल्या भावी पिढ्याना आपला आणि आपल्या पूर्वजांचा महान इतिहास समजण्यासाठी आपल्या सांस्कृतिक शत्रूवर अवलंबून राहायला लागू नये, याची जबाबदारी आपल्यावर आहे. तेव्हा उचला लेखणी आणि सनातनी संस्कृतीला खिंडार पाडण्यासाठी सज्ज व्हा. बहुजन समाजातील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी यानी जागृत राहून या सामाजिक कार्यात योगदान द्यावे.


आभार
प्रकाश पोळ
              

                   आजचा शिवाजी महाराजांचा इतिहास हा बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला आहे, हा किती खरा आणि किती खोटा याचा विचार करण्याची वेळ आली आहे, दादोजी कोंडदेव यांच्या सारखी खूप खोटी माहिती आज पर्यंत आपल्या पर्यंत पोहोचलेली असावी आणि या वर आपण आज पर्यंत आंधळेपणाने विश्वास ठेऊन होतो इथून पुढे हि चूक होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी हि समस्त बहुजन समाजाला विनंती



No comments: