Monday 16 May 2011

शिवाजी राजांचा खराखुरा मावळा.

शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या प्रत्येक माणसाने शिवाजी महाराजांचा येवढा मान आणि आदर ठेवला पाहीजे कि त्यांच्या प्रत्येक विचाराशी तो सहमत असला पाहिजे तरच तो खरा शिवाजी राजांचा खराखुरा मावळा.
शिवाजी राजांनी कधी जातपात मानली नाही. अथवा कधी आपलाच धर्म मोठा अशी घमेंड बाळगली नाही त्यांनी नेहमी सर्वधर्म समभाव हि संकल्पना राबविली, ते स्वतः राजस्थान मधील राजपूत होते परंतु त्यांनी कधी स्वतःला राजपूत म्हणून अभिमान बाळगला नाही, तर त्यांचे हे मत होते कि आपण ज्या मातीत राहतो जेथे आपण कर्म करतो जेथे आपण पोट भरतो ती जमीन आपली मायभूमी तिचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य असे मानले , त्यांनी महाराष्ट्राला आपले सर्वस्व वाहिले, महाराष्ट्रा मध्ये राहतो म्हणून स्वतःला मराठा म्हणून घेतले ,त्यांनी आपले राज्य प्रबळ व्हावे वाढावे या साठी त्यांनी इतर समाजातील शूर व कर्तबगार प्रबळ गटांना जवळ केले त्यांच्याशी सोयरिक केली त्यांना जहागीरदारी देऊन आपल्या जवळ केले त्यावेळी त्यांनी जातपात किंवा धर्म बघितला नाही या सोयरीक मध्ये राजपूत होते ब्राम्हण होते कुणबी होते,महार होते, मुसलमान होते, अश्या वेगवेगळ्या धर्मातून कुला तून एकूण ९६ कुळाच्या बरोबर जवळीक केली, त्यांनी या जहागीरदारी फक्त मराठा समाजालाच दिली नाही ,कारण त्यांची हि दूरदृष्टी होती ,त्यांच्या पुढे फक्त ध्येय होते ते स्वराज्याचे त्या पलीकडे त्यांनी काही बघितले नाही. अशा प्रकारे त्यांनी स्वराज्याची आखणी आणि पायाभरणी उत्तम रीतीने केल्या मुळेच परकीय शत्रूच्या वादळापुढे आणि नातेवाईकांच्या कलहात ते टिकून राहिले, ३० डिसेंबर च्या लोकमानस मधील ह.श.भदे यांनी महाराष्ट्रातील मराठा समाज मुळचा कोण होता ? या पत्रात लिहिले आहे कि शिवाजी महाराजांनी राज्य कारभार चालविण्यासाठी त्यांनी ९६ कुळातील कर्तबगार सरदारांना सोय म्हणून जहागिरी दिल्या त्या केवळ मराठा म्हणून नाही. त्यांनी या जहागीरदारी ब्राम्हण, मुसलमान, महार, कुणबी, यांना हि दिल्या ,यांची काळाच्या ओघात जहागीरदार ,देशमुख, पाटील हि आडनावे बनली . आज इतिहास सांगतो कि किती ब्राम्हण ,मराठे आदिलशहा , औरंगजेबास जाऊन मिळाले आणि तेथेच मुसलमान धर्म स्वीकारून राहिले तर कित्येक मुसलमान शिवाजी राजांचे जवळचे मित्र होऊन महाराष्ट्रात हिंदू धर्म स्वीकारून राहिले आज त्या मधील खूप जण ९६ कुली मराठा आहेत पण त्यांचे हे धोरण हि दृष्टी आज शिवाजी राजांचे जे तथाकथित मावळे आहेत त्यांनी आज धुळीला मिळवली आहे, आज शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग फक्त राजकारणासाठी केला जात आहे, ९६ कुली या श्रेष्ठत्वाचा अहंकार जपण्या साठी केला जातो, महार असेल तर आपली जात लपविण्यासाठी केला जातो प्रत्येक जण काहीना काही लपविण्यासाठी किंवा स्वतःच्या स्वार्था साठी करत आहे. आज मराठा समाज सतत शिवाजी महाराजांवर हक्क सांगतो पण त्यांना जास्तीत जास्त त्रास देणारा समाज हा मराठाच होता, ज्या वेळेस शिवाजी राजे मराठ्यान बरोबर इतर धर्मातल्या आणि इतर समाजातल्या शूर सरदारांना जहागिरी देत होते तेव्हा शिवाजी महाराजांचे नातेवाईक म्हणजेच तेव्हाचा कुणबी समाज जो आता मराठा समाज म्हणून ओळखला जातो तो शिवाजी महाराजांच्या विरोधात गेला होता त्यांनी मानसिक त्रास दिला होता त्यांना त्रास होता तो नातेवाइका कडून यासाठी त्यांनी नातेवाइका खेरीज इतर हि समाजातील लोकांना जवळ केले आणि स्वराज्याची वाटचाल चालू ठेवली.
आताचा शिवाजी राजांचा मावळा शिकलेला आहे , स्वतःचे विचार असणारा आहे, स्वतःचे डोके वापरणारा आहे, काय खरे काय खोटे याचा शोध घेऊन पुढे वाटचाल करणारा आहे कोणीतरी घसा फाटेपर्यंत खोट्याचे खरे सांगून दिशाभूल करणाऱ्याला जाब विचारणारा आहे, मेंढरांच्या कळपातून निघून स्वतःला माणूस म्हणून घेणारा आहे . त्याने आपल्या धर्माचा अभ्यास करावा , शिवाजी महाराज्यान च्या जीवन प्रवासाचा स्वतः अभ्यास करावा. त्याने शिवाजी महाराजांचे गुण आणि विचार अंगी बनवले पाहिजे तरच खरे शिवाजी महाराजांचे मराठा राज्य अवतरेल .
                                                                                 || जय महाराष्ट्र ||

No comments: