Monday 16 May 2011

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना तलवार दिली.

छत्रपती शिवराय ५ मार्च १६५९ रोजी कुडाळला असताना तेथे ३०० होन (रूपये १०५०/-) देऊन युरोपिअन (पोर्तुगीज) तलवार विकत घेतली.
कुडाळ-सावंतवाडी येथून विकत घेतलेली तलवार घेऊन राजे राजगडावर आले, अत्याधुनिक तलवार पाहून राज्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला, जिजाऊ मासाहेबांनी तलवार सूक्ष्म पणे पहिली, आणि सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी जिजाऊ साहेबांनी ती तलवार शिवरायांच्या हातात दिली..!!
एकाही वस्तुनिष्ट संदर्भ साधनात भवानी देवी ने तलवार दिली असा उल्लेख नाही ...!!!!
त्या तलवारी वर अजून देखील पोर्तुगीज शब्द आहेत, कृपया कधी योग आला तर जरूर पाहावा.....देवी पोर्तुगीज शब्द असलेली तलवार का देईल ??
शिवरायांनी तलवार विकत घेतली तरी देखील असा प्रचार का केला कि हि तलवार भवानी देवी ने दिली ??
शिवरायांचा पराक्रम आणि कर्तुत्व समूळ नष्ट करणे हेच ह्या प्रचारामागे षडयंत्र आहे भवानी देवी ने तलवार दिली नसती तर शिवरायांना ते जमलेच नसते,
देवीने तलवार दिली म्हणून राजे पराक्रम करू शकले अन्यथा ते शक्य नव्हते, आणि देवीच तलवार देणार असेल तर मग शिवराय कशाला हवेत, हे कार्य कोणीही करेल,
आणि देवीने ८०० वर्ष मुघलांच राज्य सहन का केल ?? मित्रांनो विचार करा.....!!!!!
शिवराय हे विज्ञान निष्ट होते, त्यांना उगाच अश्या भाकड कथांमध्ये गुंडाळू नका........!!!!

संदर्भ :- विश्ववंद्या छत्रपती शिवाजी महाराज शिवचरित्र, लेखक - श्रीमंत कोकाटे (MA .A इतिहास शिवाजी विद्यापीठ, भारतीय संस्कृती आणि मूल्य शिक्षण - KJ सोमय्या भारतीय संस्कृती पीठ, मुंबई, D.Ed सोलापूर)

No comments: